Union
Budget 2023

Highlights

Live Updates: पुण्यात पुढील 2 तासांत पावसाची शक्यता, गारठा वाढणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 16, 2021, 23:48 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:43 (IST)

  संजय राऊत हे सर्वव्यापी, आशिष शेलारांचा चिमटा
  शेलारांनी राजकारणात पुढे जायला हवं, राऊतांचा टोला

  20:32 (IST)

  राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी सर्वाधिक पुरस्कार मिळवून देशस्तरावर मोहोर उमटवली, वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या पुरस्कारांचं दिल्लीत वितरण

  20:17 (IST)

  मुस्लिमबहुल भागात लसीबाबत अजूनही संकोच - टोपे
  'लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मदत घेणार'
  राज्य सरकार सलमान खानची मदत घेणार - टोपे
  'मुस्लिम समुदायाला लस घेण्याबाबत पटवून देणार'
  धार्मिक नेत्यांचा वापर करण्याचा निर्णय - राजेश टोपे
  धार्मिक नेते, चित्रपट कलाकारांचं लोक ऐकतात - टोपे

  19:56 (IST)

  पुणेकरांचा रिक्षाचा प्रवास महागणार
  पुण्यात अखेर रिक्षाची भाडेवाढ लागू
  परिवहन विभागानं 3 रुपयांची केली भाडेवाढ
  पहिल्या मीटरसाठी 18 ऐवजी 21 रुपये लागणार
  6 वर्षांनंतर रिक्षा प्रवासात पहिल्यांदा भाडेवाढ
  22 नोव्हेंबरपासून होणार नवे दर लागू
  सर्व रिक्षाचालकांना मीटर अपडेटच्या सूचना

  19:49 (IST)

  फडणवीस स्वत:ला मुख्यमंत्री मानतायत - मलिक
  देवेंद्रजी, स्वप्न बघायचं बंद करा - नवाब मलिक
  'मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेजी आहेत, तुम्ही नाहीत'

  19:27 (IST)

  गडचिरोली - आणखी एक मृतदेह सापडला
  चकमकीतील मृत माओवाद्यांची संख्या 27 वर
  सापडलेला मृतदेह जहाल माओवादी सुखलालचा
  माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य
  सुखलालवर 25 लाख बक्षीस, अनेक घटनांचा सूत्रधार
  उत्तर गडचिरोलीत माओवादी चळवळीला धक्का

  19:19 (IST)

  एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंची मुंबई पोलीस मुख्यालयात घेतली भेट, 25 मिनिटं चर्चा केली, भेटीचं कारण स्पष्ट नाही

  19:8 (IST)

  मुंबई - भाजप कोअर कमिटीची बैठक सुरू
  विधान परिषद निवडणुकीच्या नावावर चर्चा
  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची रणनीती ठरणार

  19:8 (IST)
  म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे 4222 सदनिकांची 7 जानेवारीला संगणकीय सोडत; सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणी, अर्ज भरणा-स्वीकृतीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते प्रारंभ
   
  18:49 (IST)

  महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत प्रवेशिका पाठवा, सांस्कृतिक संचालनालयाचं आवाहन

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स