• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात तब्बल 3035 नवे रुग्ण

Live Updates : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात तब्बल 3035 नवे रुग्ण

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 16, 2022, 20:03 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:33 (IST)

  दुबई, यूएईमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आता 7 दिवस होम क्वारंटाईन आणि आरटीपीसीआर सक्तीची नाही, दुबई आणि यूएईमधून येणाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन नियमावली लागू नाही

  20:32 (IST)

  'शाळांबाबत 15 दिवसांनंतर पुनर्विचार करणार'
  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
  मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण कमी - टोपे
  पालकांमध्ये मात्र दोन प्रवाह - राजेश टोपे
  परिस्थितीनुसार निर्णय घेणार - राजेश टोपे

  20:27 (IST)

  निवडणूक आयोगानं जारी केलेल्या कोरोना नियमांचं उल्लंघन
  छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर गुन्हा
  इतर व्यक्तींवरही गुन्हा दाखल, कायदेशीर कार्यवाही सुरू

  20:22 (IST)

  पंतप्रधान मोदींचं उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रात्री 8.30 वाजता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस 

  अजेंडामध्ये 'स्टेट ऑफ द वर्ल्ड' यावर विशेष भाषण

  20:2 (IST)

  नाशिक :

  - नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ

  - आज दिवसभरात तब्बल 3035 नव्या रुग्णांची नोंद

  - ३०३५ पैकी नाशिक शहरातील १६७८  ग्रामीण भागातील ११८५ मालेगाव ६१ तर जिल्हा बाह्य १११

  - दिवसभरात नाशिक जिल्ह्यात पालिका क्षेत्रातील १ रुग्णाच्या मृत्युची नोंद 

  - दिवसभरात जिल्ह्यात १३५० रुग्ण बरे झाल्याची नोंद

  - सद्यस्थितीत जिल्ह्यात १०९८२ कोरोना रुग्ण उपचारा खाली

  20:0 (IST)

  महाराष्ट्रात दिवसभरात 41,327 नवीन रुग्ण
  महाराष्ट्रात दिवसभरात 40,386 कोरोनामुक्त
  महाराष्ट्रात 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  19:48 (IST)

  गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी
  '13-सूत्री गोवा मॉडेल'चं केजरीवालांकडून अनावरण
  खाणकाम, जमीनहक्क, रोजगार हा 'आप'चा अजेंडा

  19:18 (IST)

  मुंबईतल्या कोरोना रुग्णसंख्येत घट
  मुंबईत दिवसभरात 7 हजार 895 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 11 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू

  18:57 (IST)

  चंद्रशेखर बावनकुळेंची 'मविआ'वर जोरदार टीका, हे सरकार फक्त खोटं बोलण्याचं काम करते - बावनकुळे

  18:53 (IST)

  अमरावतीत पोलिसांचा बंदोबस्त वाढवला - गृहमंत्री
  कायदा-सुव्यवस्थेसाठी काळजी घेतली - वळसे पाटील
  'शिवरायांचा पुतळा विनापरवानगी बसवला होता'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स