LIVE: मुंबईत आगडोंब! रबाळे MIDC नंतर आता मालाडमध्येही भीषण आग

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 16, 2021, 19:44 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:23 (IST)

  'ती' लक्झरी कार एनआयएनं केली जप्त
  'त्या' कारची एनआयएकडून कसून तपासणी
  महागड्या गाडीच्या डिकीतून रोकड जप्त
  ज्वलनशील पदार्थ, महत्वाची कागदपत्रं जप्त
  महागड्या गाडीबाबत एनआयएची प्रतिक्रिया
  'गाडीत सापडली नोटा मोजण्याची मशीन'
  गाडीत सापडले 5 लाख रुपये - NIA अधिकारी
  गाडीत काही कपडे सापडल्याची माहिती
  ही गाडी वाझे वापरत होता - NIA अधिकारी

  22:5 (IST)

  केडीएमसीच्या डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग
  आधारवाडी भागात आहे डम्पिंग ग्राऊंड
  खाडीमुळे अग्निशमनला पोहोचण्याला अडचण

  21:34 (IST)

  इतर राज्यांत कोरोना नियंत्रणात - प्रवीण दरेकर
  'मग महाराष्ट्रातील कोरोनावाढीला जबाबदार कोण?'
  सरकारमध्ये समन्वय, नियोजनाचा अभाव - दरेकर
  प्रवीण दरेकरांची मविआ सरकारवर टीका

  20:58 (IST)

  राज्यात कोरोनाचं संकट आणखी गडद
  राज्यात दिवसभरात 17,864 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 87 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 9,510 कोरोनामुक्त
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 91.77 टक्के
  राज्यात सध्या 1 लाख 38,813 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:56 (IST)

  राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य पूर्ण प्रयत्न करतंय, प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी 2.20 कोटी डोस उपलब्ध करून द्या, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे मागणी

  20:50 (IST)

  उद्धव ठाकरे - परमबीर सिंग यांची बैठक
  स्वत:ची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार - सूत्र
  बैठकीला मंत्री अनिल परबही उपस्थित
  पोलीस महासंचालक हेमंत नगराळे 'वर्षा'वर
  शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली - सूत्र
  राज्यातील घडामोडींवर दूरध्वनीवरून झाली चर्चा?

  20:35 (IST)

  नागपुरात आतापर्यंत परवानगी असलेली किराणा, भाजीपाला, फळं, मांस दुकानं दुपारी 1 पर्यंतच सुरू राहतील, नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी काढले आदेश

  20:23 (IST)

  मुंबई आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढली
  मुंबईत दिवसभरात 1922 नवे कोरोना रुग्ण
  मुंबईत दिवसभरात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू

  20:9 (IST)

  मुंबईत वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या
  महापालिका प्रशासनानं उचललं पाऊल
  महापालिका शिक्षकांना वर्क फ्रॉमचे आदेश
  पुढील आदेशापर्यंत वर्क फ्रॉम होम

  20:0 (IST)

  गोरेगावच्या खडकपाडा परिसरात भीषण आग
  लाकडाच्या वखारी, झोपडपट्टीमुळे चिंता वाढली
  अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न
  नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीत आग
  एका खासगी कंपनीला लागली मोठी आग
  अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स