मुख्यमंत्र्यांसोबत झाली ओबीसी नेत्यांची बैठक
छगन भुजबळ, नाना पटोले बैठकीला होते उपस्थित
18:42 (IST)
संभाजीराजे, मराठा मोर्चा समन्वयकांची उद्या संध्याकाळी 5 वा. 'वर्षा'वर महत्वाची बैठक, मागण्या मान्य करण्याची सरकारकडून तयारी; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य बैठकीला राहणार उपस्थित
18:26 (IST)
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा मागण्यांसाठी संप
संपाची वेळ येणं हे अतिशय दुर्दैवी - देवेंद्र फडणवीस
'कोरोना काळात या सेविकांचं अतिशय उत्कृष्ट काम'
सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करा - फडणवीस
'सरकारनं आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना दिलासा द्यावा'
'संप लवकर मिटेल या दृष्टीनं तातडीनं पावलं उचलावीत'
16:55 (IST)
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतली, महाराष्ट्रातील इतर खासदारांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आहे - राहुल शेवाळे
16:16 (IST)
पुढील दोन दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स