liveLIVE NOW

Live Updates : भिवंडीमध्ये फर्निचर गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 16, 2021, 00:02 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:55 (IST)

  आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
  'मुख्यमंत्र्यांनी राज्याला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे'
  'षण्मुखानंदमध्ये उद्धव ठाकरेंचा दशावतार सुरू होता'
  'आरएसएस मेळावा हा विचारांची श्रीमंती होती'
  भीती होती म्हणून चिरकण्याची भाषा - आशिष शेलार
  संघपद्धतीवर नख लावण्याचा प्रयत्न नको - शेलार
  'देशाची एकता-अखंडता तोडण्याचं काम होतंय'
  'हिंदुत्वासाठी उपरी चालतील, टपोरी चालणार नाहीत'
  2019 नंतरचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं - शेलार
  ...तर शालीचा रंग बदलणाऱ्यांनी सांगू नये - शेलार
  'जे सरकार बोजानं पडणार आहे, काय आव्हान देऊ?'
  सत्याची भूमिका फडणवीसांची आहे - आशिष शेलार
  'कसलं हिंदुत्व? मंदिर बंद, गरबा बंद, श्रावणात मंदिर बंद'
  'भावनिक आवाहन करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न'
  'सावरकरांची बदनामी करणाऱ्यांच्या मांडीला मांडी'
  'आम्ही अॅसिड फेकलं की नाही हे राज्यानं पाहिलंय'
  पण सत्तेसाठी अनैतिक संबंध जोडले - आशिष शेलार

  20:29 (IST)

  चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
  उद्धव ठाकरेंनी दसऱ्याचा शिमगा केला - पाटील
  'सरकारकडून अजूनही शेतकऱ्यांना मदत नाही'
  'केंद्राच्या नावानं शिमगा करून काय उपयोग?'
  शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं? - चंद्रकांत पाटील
  राज्यात महिला अत्याचार वाढलेत - चंद्रकांत पाटील
  शिवसेनेनं कधी उपरे घेतले नाही का? - पाटील
  स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही कुठे होता? - चंद्रकांत पाटील

  20:29 (IST)

  '25 वर्षं एकत्र नांदला, आता एकतर्फी प्रेम म्हणता'
  या विषयावर बोलण्यात अर्थ नाही - प्रवीण दरेकर
  'अमित शाहांनी याबाबत सविस्तर माहिती दिलीय'
  'कार्यकाळात काय चांगलं काम हे सांगणं गरजेचं होतं'
  'मुंबईशिवाय राज्यात इतर काही केल्याचं सांगितलं नाही'
  'फक्त फडणवीसांविषयी आकस भाषणात दिसत होता'
  सत्तेसाठी विचार त्यांनी बाजूला ठेवले - प्रवीण दरेकर
  भाजपला सत्तापिपासू म्हणणं योग्य नाही - दरेकर
  'बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वात फरक'
  विरोधी पक्षनेते दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
  जनतेच्या मनात फडणवीस सीएम - प्रवीण दरेकर
  'पोलीस यंत्रणेवर वाद निर्माण करणं योग्य नाही'

  19:43 (IST)

  षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा संपन्न
  शिवसैनिक हेच माझं शस्त्र - उद्धव ठाकरे
  'आवाज दाबणारा जन्माला येऊ शकला नाही'
  मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता फडणवीसांना टोमणा
  'मी मुख्यमंत्री आहे असं कोणाला वाटू नये'
  'मी पुन्हा येईन म्हणणारे आलेच नाहीत'
  अहंपणा डोक्यात जायला नको - उद्धव ठाकरे
  मी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष - उद्धव ठाकरे
  माझ्या भाषणाकडे अनेकांचं लक्ष - उद्धव ठाकरे
  'भाषणानंतर चिरकायला अनेकजण तयार'
  'ठाकरे कुटुंबावर हल्ला करणारा जन्माला यायचाय'
  'आमच्यावर टीका म्हणजे रोजगार हमी योजना'
  'हर्षवर्धनांच्या वक्तव्यांचा सीएमनी दिला दाखला'
  'आम्ही स्वत:हून कोणाच्या अंगावर जात नाही'
  'स्वत:मध्ये हिंमत असेल तर अंगावर या'
  ईडी, सीबीआयआडून येऊ नका - उद्धव ठाकरे
  ...तर तुम्हीही मुख्यमंत्री झाला असता - उद्धव ठाकरे
  देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा टोला
  'बाळासाहेबांना दिलेलं वचन अजूनही पूर्ण करायचंय'
  'शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवणारच'
  धर्माचा अभिमान असायलाच हवा - उद्धव ठाकरे
  मोहन भागवत यांच्या वक्तव्यांचे दाखले
  लखीमपूर घटनेवरून उद्धव ठाकरेंची टीका
  'अंमली पदार्थांचा नायनाट केला पाहिजे'
  'हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा'
  मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना पुन्हा आव्हान
  'सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले'
  उद्धव ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचं कौतुक
  'हर हर महादेव दिल्लीला दाखवावंच लागेल'
  'नवहिंदुत्वा'पासून हिंदुत्वाला धोका - उद्धव ठाकरे
  'माय मरो आणि गाय जगो हे हिंदुत्व नाही'
  'सावरकर शब्द उच्चारायची लायकी आहे का?'
  'शिवसैनिक तुमची पालखी वाहत नाही'
  ...म्हणून तो भ्रष्टाचारी होतो? - उद्धव ठाकरे
  आम्ही देशभक्तीच्या पालखीचे भोई - मुख्यमंत्री
  'देव, देश, धर्मासाठी शिवसैनिकांचा जन्म'
  '1992 साली शिवसैनिकांनी मुंबई वाचवली'
  'जगातल्या मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाही'
  'निवडणुकीत उपऱ्यांना तिकीट द्यावं लागतं'
  हिंदुत्व हे रक्तात असावं लागतं - उद्धव ठाकरे
  एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
  ठाण्यातील रक्तदान शिबिराबद्दल केलं कौतुक
  रक्तदान करणं हा सुद्धा धर्म - उद्धव ठाकरे
  'राज्यपालांच्या पत्राचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार'
  'महिलांवर देशभरात अत्याचार होत आहेत'
  'राज्यात बलात्काऱ्याला दयामाया नाही'
  घटना होणार यासाठी कायदा करा - मुख्यमंत्री
  'उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुललाय का?'
  उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथांना सवाल
  'पोलिसांचं कौतुक करायचं की माफिया म्हणायचं'
  'मुंबई पोलिसांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर'
  'तुम्हाला शिमगा करण्यासाठी अडवलं'
  म्हणून माझे पोलीस माफिया का? - उद्धव ठाकरे
  उद्धव ठाकरेंचा भाजप नेत्यांना खडा सवाल
  महाराष्ट्र सत्याला जागणारा प्रदेश - मुख्यमंत्री
  'मी जवानांपेक्षा जास्त देशभक्त होतो, हे दुर्दैव'
  'माझा देश नेमका कुठे चालला आहे?'
  'राज्यांना सार्वभौमत्वाचे अधिकार आहेत'
  ...तर केंद्राची लुडबूड कशाला? - उद्धव ठाकरे
  अमृतमहोत्सवावर अमृत मंथन करा - मुख्यमंत्री
  'महाराष्ट्रातच ड्रग्ज, गांजा फोफावलाय का?'
  राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न - उद्धव ठाकरे
  एनसीबी कारवाईवर उद्धव ठाकरेंची टीका
  युवाशक्ती मोठी शक्ती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  'त्यांना नीट घडवलं नाही तर देशाची घडी बिघडेल'
  देशातील तरुणांना नोकरी पाहिजे - मुख्यमंत्री
  काहींना सत्तेची चटक लागलीय - मुख्यमंत्री
  'तुम्हाला सत्ता हवी तर देऊन टाकतो'
  पण महाराष्ट्राला बदनाम करू नका - मुख्यमंत्री
  'धारावीतील लोकांचं पुनर्वसन करणार'
  'धारावीत जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र'
  'मुंबईत लष्कराचं संग्रहालय करणार'
  'मराठी रंगभूमी दालनही सुरू करणार'
  मराठी माणसांची एकजूट दाखवा - उद्धव ठाकरे
  कोणी कितीही वार करायला येवो - उद्धव ठाकरे
  'तलवार तोडून पार्सल परत पाठवायची तयारी ठेवा'
  उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना कानमंत्र

  18:13 (IST)

  ऐतिहासिक करवीर नगरीतला शाही दसरा संपन्न
  शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानात सोहळा
  कोल्हापूरमधला पारंपरिक आणि देखणा सोहळा
  आपट्याची पानं लुटून नवरात्रोत्सवाची सांगता
  छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या हस्ते शमीपूजन

  17:44 (IST)

  शिवसेना हे आपलं दायित्व साजरं करतंय - डॉ.गोऱ्हे
  'काही परप्रांतीयांना आणून राजकारण करतायत'
  शिवसेना ही मुंबईची आई आहे - डॉ.नीलम गोऱ्हे
  काहीजण दाईची भूमिका घेत आहेत - डॉ.नीलम गोऱ्हे

  17:30 (IST)
  अल्पसंख्याक विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहारासाठी मिळणार रोख रक्कम, मासिक 3 ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार - नवाब मलिक
  17:26 (IST)

  जयंत पाटील यांचं मराठवाड्याला अनोखं गिफ्ट
  मध्य गोदावरी उपखोऱ्यातील 19.29 टीएमसी पाणी
  अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदा मंत्र्यांची मान्यता

  17:13 (IST)

  छत्तीसगड - जशपूरमधील धक्कादायक प्रकार
  चौघांचा मृत्यू, 20 पेक्षा अधिक जखमी
  दुर्गा विसर्जन मिरवणुकीतील दुर्घटना
  कार चालकाला पोलिसांकडून अटक

  17:10 (IST)

  ऐतिहासिक करवीर नगरीत शाही दसरा महोत्सव
  शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानात सोहळा
  कोल्हापूरमधला पारंपरिक आणि देखणा सोहळा
  आपट्याची पानं लुटून नवरात्रोत्सवाची होणार सांगता
  छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या हस्ते शमीपूजन होणार
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त पासधारकांनाच प्रवेश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स