Live Updates: मुंबईतील कांजुरमार्गमध्ये पुर्वा इंडस्ट्रीयल इस्टेटला आग

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 15, 2021, 22:24 IST
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:26 (IST)

  मुंबईच्या कांजुरमार्ग परिसरात भीषण आग
  हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लागली आग
  2 दुकानं जळाल्याची माहिती, झाडंही पेटली
  अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी
  आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

  21:57 (IST)

  नंदुरबार : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील घटना
  मोदलपाडा गावाजवळ 2 दुचाकींचा भीषण अपघात
  2 दुचाकीस्वार जागीच ठार, दोघांची प्रकृती गंभीर

  21:30 (IST)

  मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी उद्या बैठक बोलावली
  एसटी विलीनीकरणाबाबत मंत्रालयात संध्या.5 वा. बैठक
  विलीनीकरणाबाबत मुख्य सचिवांतर्गत समिती गठित
  वित्त आणि परिवहन प्रधान सचिव या समितीत
  कामगार संघटनेच्या काही प्रतिनिधींना बोलावणार
  प्रतिनिधी निवेदन देऊन आपली बाजू मांडतील
  बैठकीतील मिनिट‌्स सरकार कोर्टात सादर करणार

  20:34 (IST)

  अमरावती - मलिकांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, भाजप नेते अनिल बोंडेंचा नवाब मलिकांना इशारा

  20:14 (IST)

  अशोक चव्हाणांनी नितीन गडकरींची घेतली भेट
  'नांदेड ते हैदराबाद ग्रीन फिल्ड रस्त्याबाबत चर्चा'
  'औरंगाबाद-पुणे या रस्त्यासंदर्भातही चर्चा केली'
  मराठवाड्यातील बुलेट ट्रेनची विनंती केली - चव्हाण
  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकारात्मक - चव्हाण
  प्रज्ञा सातव यांची जागा येणार - अशोक चव्हाण
  दंगलीच्या घटना ही गंभीर बाब - अशोक चव्हाण
  'या गोष्टी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली'

  19:14 (IST)

  गडचिरोली - माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या सी-60 जवानांना 51 लाख रुपयांचं बक्षीस, गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

  19:2 (IST)

  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्या राज्यभरात डीएलईडी परीक्षा होणार, ही परीक्षा 16 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत होणार, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 88 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार, 32 हजार 876 विद्यार्थ्यांची डीएलईडी परीक्षेसाठी नाव नोंदणी

  18:58 (IST)

  नितीन गडकरी - अशोक चव्हाणांची दिल्लीत बैठक
  गडकरींच्या निवासस्थानी संध्या. 7.30 वाजता बैठक

  18:36 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विशेष कार्यकारी अधिकारी
  ओएसडी सुधीर नाईकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
  मुंबई सेंट्रलच्या वॉकहार्ट रुग्णालयात केलं दाखल
  सीएम कार्यालय, 'वर्षा'वरील सर्व कर्मचारी-अधिकारी
  या सर्वांची तात्काळ कोरोना संसर्ग तपासणी होणार
  ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचीही काळजी घेणार
  सीएम कार्यालय, वर्षा निवासस्थानाचं सॅनिटायझेशन

  17:51 (IST)

  अमरावती - बंददरम्यान दगडफेक, तोडफोड प्रकरण
  भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडेंची सुटका
  महापौर चेतन गावंडेंसह 14 जणांची कोर्टाकडून सुटका
  आज सकाळी सर्वांना पोलिसांनी केली होती अटक

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स