• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: 'शिवस्मारकासाठी अडीच वर्षात अडीच मिनिटेही मुख्यमंत्र्यांनी दिले नाही', विनायक मेटेंची टीका

Live Updates: 'शिवस्मारकासाठी अडीच वर्षात अडीच मिनिटेही मुख्यमंत्र्यांनी दिले नाही', विनायक मेटेंची टीका

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 15, 2022, 21:55 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:8 (IST)

  उद्धव ठाकरेंकडून अभिनेते प्रसाद ओक यांचं कौतुक, म्हणाले...

  - प्रसाद ओक यांनी आनंद दिघे पुन्हा जिवंत केले
  - आनंद दिघेंच्या बारीक सारीख नकवी हुबेहुब उभे केले
  - सर्वांनी हा चित्रपट आवश्य जरुर पाहावं
  प्रत्येक शहरात एक आनंद दिघे पाहिजे. 
  शिवसैनिक कसा असावा, ते चित्रपट पाहिल्यावर दिसेल
  - चित्रपटाचा खरा भाग आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे.
  - असे शिवैसिनक मला लाभले. 
  - धर्मनिष्ठा, संघटना यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत
  - एका प्रसंगात बाळासाहेब रागावलेलं दाखवलंय, ते खरंय, दिलेल्या वेळेत आनंद दिघे यायचे नाहीत
  - बाळासाहेब आनंद दिघेंनी दिलेल्या यादीला हातही लावायचे नाहीत
  - चित्रपटाचा शेवटचा प्रसंग पाहू शकलेलो नाही

  22:7 (IST)

  मुख्यमंत्र्यांनी थिएटरमध्ये पाहिला 'धर्मवीर'
  'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' चित्रपट पाहिला
  प्रसाद ओक यांची अप्रतिम भूमिका - उद्धव ठाकरे
  सर्वांनी चित्रपट नक्की पाहावा - उद्धव ठाकरे
  'चित्रपटातून आयुष्य जगावं कसं हे शिकायला मिळेल'
  आनंद दिघेंना पुन्हा जिवंत केलं - उद्धव ठाकरे
  'प्रत्येक शहरात एक आनंद दिघे पाहिजे'
  मुख्यमंत्र्यांकडून 'धर्मवीर'च्या टीमचं कौतुक

  21:53 (IST)

  'शिवस्मारकासाठी अडीच वर्षाच अडीच मिनिटेही मुख्यमंत्र्यांनी दिले नाही', विनायक मेटेंची टीका

  महाराष्ट्र राज्यातील सरकारची सकाळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच होते. तर शिवसेनेचा जन्मच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन झालाय तरीही अडीच वर्षात अडीच मिनिटेही सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी दिला नसल्याची खंत विनायक मेटे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पंचवीस ते तीस वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र त्यांनी त्याचेही उत्तर आजपर्यंत दिले नाही. त्यामुळे शिवसेनेचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शिवाजी महाराजांवर असलेल्या प्रेम खरं की खोटं हे जनतेने ठरवावं, अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी केली. 

  21:29 (IST)

  किशोरी पेडणेकरांची फडणवीसांवर टीका
  'उद्धव ठाकरे लाफ्टर शो कधीच करत नाहीत'
  'भाजपची उत्तरपूजा मुंबईकर नक्कीच करणार'
  मुंबईला केंद्रशासित करण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार
  'हाताला काम, पोटाला भाकरी हे आमचं हिंदुत्व'
  आजची सभा उत्तर भारतीयांना लुभावणारी - पेडणेकर
  'मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊ शकत नाही'
  आणि आज हिंदीत बोलले - किशोरी पेडणेकर

  20:24 (IST)

  'ती' मास्टर सभा नव्हे, लाफ्टर सभा - फडणवीस
  मुख्यमंत्र्यांच्या बीकेसी सभेची उडवली खिल्ली
  'काल कौरवांची सभा, आज पांडवांची सभा'
  'अडीच वर्षांत विकासावर एकही भाष्य नाही'
  मुंबईत कोरोना काळात भ्रष्टाचार - फडणवीस
  जाधवांची संपत्ती 35 वरून 53 वर - फडणवीस
  सरकारमधले मंत्री जेलमध्ये गेले - फडणवीस
  औरंगजेबाला शरण जाणारे मोकाट - फडणवीस
  'हनुमान चालिसा वाचणं गुन्हा आहे का?'
  आम्ही सर्वांचा मुकाबला करू - फडणवीस
  देशात भगवा झेंडा फडकणार - फडणवीस
  आम्ही तलवार म्यान केली नाही - फडणवीस
  'मी बाबरी पाडायला गेलो याचा अभिमान'
  बाबरीवरून सेनेला मिरची लागली - फडणवीस
  देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
  'लाठी गोली खाएंगे लेकिन मंदिर वहीं बनाएंगे'
  'मी तुमच्यासारखा सहलीला गेलो नव्हतो'
  अयोध्येत तुमचा एकही नेता नव्हता - फडणवीस
  'सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्म घेतला नाही'
  लाठ्या खाऊन इथपर्यंत पोहोचलो - फडणवीस
  'फोटोग्राफी करून वाघ होता येत नाही'
  'माझं राजकीय वजन कमी करू शकत नाही'
  'तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही'
  कुठल्या संघर्षात तुम्ही दिसले नाहीत - फडणवीस
  तुमचं हिंदुत्व गधाधारीच - देवेंद्र फडणवीस
  'देशात आता एकच वाघ ते म्हणजे नरेंद्र मोदी'
  दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारे मोदी - फडणवीस
  सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक केला - फडणवीस
  'खरा पैलवान ठोकर मारतो, गाढव लाथ मारतो'
  5 वर्षं आमच्यासोबत संसार केला - फडणवीस
  'आमची संपत्ती घेऊन दुसऱ्यासोबत लग्न केलं'
  'कालचं भाषण सोनिया गांधींना समर्पित'
  'मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीच तोडू शकत नाही'
  'मुंबई तुमच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करायचीय'
  शेलारांच्या एकातरी प्रश्नाचं उत्तर द्या - फडणवीस
  'तुम्ही म्हणजे मुंबई नाही, महाराष्ट्र नाही'
  तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही - फडणवीस
  'मुंबई-महाराष्ट्राचा एकच बाप, छत्रपती शिवराय'
  मोदी हे गरीबांसाठी मसिहा ठरले - फडणवीस
  'सकाळचा शपथविधी अयशस्वी याचा आनंद'
  मलिक, देशमुखांना स्थान दिलं नसतं - फडणवीस
  आम्ही सर्व मिळून लंकादहन करू - फडणवीस
  बीएमसीवर भाजपचा भगवा फडकेल - फडणवीस

  19:10 (IST)

  करारा जवाब मिलेंगा, आशिष शेलारांचा इशारा
  मुंबई पालिकेवर भाजपचीच सत्ता येणार - आशिष शेलार

  18:51 (IST)

  मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे 'धर्मवीर' चित्रपट पाहण्यासाठी 'वर्षा' निवासस्थानावरुन रवाना

  18:38 (IST)

  देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या आधी हनुमान चालीसाचं पठण

  18:33 (IST)

  - देवेंद्र फडणवीस गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभास्थळी दाखल
  - उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार?

  18:25 (IST)

  शिवसेना नेते संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया : 

  - 8 तारखेला औरंगाबादला शिवसेनेची रेकॉर्ड ब्रेक सभा होईल

  - आम्ही सभेची तयारी सुरु केली आहे

  - संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील 

  - सभेला किती शिवसैनिक येतील सांगू शकत नाही मात्र जंगी सभा होईल 

  - मंत्री संदीपान भुमरे यांची माहिती

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स