• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 42 हजार 462 नवे रुग्ण

Live Updates : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 42 हजार 462 नवे रुग्ण

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 15, 2022, 22:34 IST
  LAST UPDATED 12 DAYS AGO

  हाइलाइट्स

  23:40 (IST)

  पुण्यात खाशाबा जाधव जयंतीनिमित्त महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा

  महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा खाशाबा जाधव पुरस्काराने गौरव

  22:46 (IST)

  नाशिक :

  - सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरातही फळांची आकर्षक सजावट

  - साडेतीन शक्ती पिठा पैकी अर्ध्य पीठ असणारे देवीचे मंदिर सजले

   - संक्रांत आणि देविचा शाकंभरी नवरात्री उत्सवा निमित्ताने सजावट

  - मंदिरात सुरू आहे  सुदर्शन याग 

   - यागाचे औचित्य साधून देवीच्या एका भक्ताने केली सजावट 

  - साधारणपणे 1100 फळांचा उपयोग

  22:33 (IST)

  महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात तब्बल 42 हजार 462 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 23 जणांच्या मृत्यूची नोंद, तर 39 हजार 646 रुग्णांची कोरोनावर मात

  21:33 (IST)

  जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांना कोरोनाची लागण, घरीच झाले क्वारंटाईन

  21:23 (IST)

  आसाममध्ये अडकलेल्या सर्व मुलांची अखेर सुटका
  हॉस्पिटलमधून सर्व मुलांना आसाम सरकारनं सोडलं
  सर्व मुलं सध्या न्यू हॉकलॉगच्या रेल्वे स्टेशनला
  तिथून पुढे गुवाहाटीला, नंतर रेल्वेनं महाराष्ट्रात येणार
  'न्यूज18 लोकमत'नं केला होता पाठपुरावा
  विद्यार्थी राहुल वाळकेची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती
  प्रतीक ठुबेंनी या मुलांना सर्वतोपरी केली मदत
  आसामचे मराठी आयपीएस अधिकारी प्रतीक ठुबे

  20:59 (IST)

  अंबरनाथ :

  अंबरनाथमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला अचानक लागली आग

  पूर्वेच्या मोतीराम पार्क परिसरात लागली आग

  अग्निशमन दलानं घटनास्थळी 

  सुदैवानं आगीत कुणालाही इजा नाही

  20:7 (IST)

  वर्धा - आर्वीतील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी डॉ.कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल तर काळविटाची कातडी प्रयोगशाळेत पाठवणार, आरोग्य विभाग आणि पोलिसांकडून पंचनामा

  20:7 (IST)

  भिवंडीतील बोगस कॉल सेंटरचा ठाणे पोलिसांकडून पर्दाफाश; मोठ्या प्रमाणात सीमकार्ड आणि इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जप्त, 2 जण पोलिसांच्या ताब्यात

  20:1 (IST)

  मार्केटयार्डातील इमारतीची लिफ्ट कोसळून एक ठार; तिघे जखमी


  अहमदनगर : मार्केट यार्ड येथील एका दुकानातील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळे शिवम भाऊसाहेब झेंडे जागीच ठार झाला असून प्रिया पवार,शितल चीमकडे, ओंकार  निमसे जखमी झाले आहेत, या तीन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  20:0 (IST)

  मला परिपक्व व्हायचं नाही - श्रीकांत शिंदे
  'माणूस परिपक्व झाला की रिटायरमेंटची वेळ येते'

  'मला जनतेत राहायचंय, काम करत राहायचंय'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स