दोन वर्षांच्या कोविड काळानंतर ठाण्यात मॅरेथॉनचे नियोजन
कर्करोगाप्रती जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ठाणे शहरात कोविड काळानंतर ठाणे महानगरपालिका आणि जितो हॉस्पिटलच्या माध्यमातून 20 मार्च रोजी मॅरेथॉनचे नियोजन करण्यात आले आहे. तर आज हाफ मॅरेथॉनचा लोगो आणि रेस डे जर्सीचे अधिकृत उद्घाटन ठाणे महापौर नरेशजी म्हस्के आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.