'OBC आरक्षणाशिवाय कुठल्याच निवडणुका नकोत'
या भूमिकेवर राष्ट्रवादी आजही ठाम - नवाब मलिक
21:26 (IST)
अभिनेत्रीकडून होम क्वारंटाईन नियमांचं उल्लंघन
आलिया भट चार्टर्ड प्लेननं शूटिंगसाठी दिल्लीला
करण जोहरकडून आयोजित पार्टीत होती सहभागी
आलिया भटची कोविड चाचणी आली होती निगेटिव्ह
आलिया भट हायरिस्क रुग्णाच्या आली होती संपर्कात
मुंबई पालिकेनं होम क्वारंटाईनचं घातलं होतं बंधन
20:39 (IST)
ओमायक्रॉनचा संसर्ग जगात झपाट्यानं वाढतोय
राज्यातदेखील ओमायक्रॉनचे रुग्ण आढळतायत
'हे रुग्ण मोठ्या, लहान शहरातही आढळू शकतात'
'जानेवारीत मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला आढळेल'
प्रदीप व्यास यांचं मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण
'लसीचे 2 डोस सर्वांना देण्यासाठी प्रयत्न करा'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे बैठकीदरम्यान निर्देश
20:13 (IST)
गडकरी-मल्लिकार्जुन खरगेंमध्ये दिल्लीत चर्चा
नितीन गडकरींच्या निवासस्थानी झाली बैठक
राज्यात आज ओमायक्रॉनचे 4 रुग्ण आढळले
उस्मानाबाद 2, बुलडाणा 1 तर मुंबईत 1 रुग्ण
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे एकूण 32 रुग्ण
25 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, घरी सोडलं
18:51 (IST)
लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच पार्टीला एन्ट्री
'न्यूज18 लोकमत'ला सूत्रांची माहिती
50 टक्के क्षमतेनं हॉटेल-बार सुरू राहणार
पूर्ण हॉटेल स्टाफचं लसीकरण आवश्यक
18:33 (IST)
'16 ते 31 डिसेंबर मुंबईत असणार निर्बंध'
मुंबई पोलिसांनी जारी केले आदेश
उद्यापासून 31 तारखेपर्यंत कलम 144 लागू
18:21 (IST)
अमित शाहांचा पुणे दौरा अखेर ठरला
अमित शाह 19 डिसेंबरला पुणे दौऱ्यावर
पुणे मनपात छत्रपती स्मारकाचं भूमिपूजन
अमित शाह पक्षकार्यकर्त्यांचा मेळावाही घेणार
18:7 (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत कोकणातील पूरस्थिती नियंत्रणासाठी अनेक महत्वाचे निर्णय, वशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचं काम तीन टप्प्यांत होणार, एकाच वेळी अनेक ठिकाणी गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात, नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी आवश्यक यांत्रिकी विभागाची यंत्रणा, मोठ्या मशिनरी खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचे जलसंपदा विभागाला निर्देश
नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी आवश्यक निधी जलसंपदा विभागाला तातडीनं वर्ग करण्याच्या सूचना, पूरस्थिती टाळण्यासाठी नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचं काम युद्धपातळीवर करा - उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स