liveLIVE NOW

LIVE : कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण; माजी आमदार विवेक पाटील यांना अटक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 15, 2021, 22:16 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:15 (IST)

  रायगड - कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण
  माजी आमदार विवेक पाटील यांना अटक
  माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक 

  20:52 (IST)

  राज्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक
  राज्यात दिवसभरात 15,176 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 9,350 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 388 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.69 टक्के
  राज्यात सध्या 1 लाख 38,361 अॅक्टिव्ह रुग्ण
  राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्युदर 1.93 टक्के 

  20:25 (IST)

  लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या 2 दिवसांत निर्णय; मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींची माहिती 

  20:17 (IST)

  'कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचं चित्र'
  'नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं'
  'नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी गरजेची'
  'जास्त लसीकरणामुळे उपाययोजनांना बळ मिळेल'
  वि.प. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सूचना 

  18:11 (IST)

  'नारायण राणेंबाबतचा निर्णय दिल्लीतील नेते घेतील'
  नाना पटोलेंना मुख्यमंत्री केलं पाहिजे - रावसाहेब दानवे
  'मविआतील 3 पक्षांचे 3 मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा'
  कारण 2024 नंतर भाजपची सत्ता - रावसाहेब दानवे
  'भाजप 2024 च्या निवडणुका स्वबळावर लढवणार' 

  18:11 (IST)

  महाराष्ट्र सरकारनं एकमतानं संमत केलं होतं विधेयक
  मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचं पुनर्विकास विधेयक
  विधेयक राष्ट्रपती कार्यालयात 6 महिने मंजुरीच्या प्रतीक्षेत
  तातडीनं मंजुरी देण्याची शिवसेनेची राष्ट्रपतींकडे मागणी 

  17:58 (IST)

  आशा सेविकांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल
  उद्या सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार बैठक
  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा पुढाकार
  आशा, गटप्रवर्तक आंदोलक प्रतिनिधींना बोलावणं
  तोडगा निघाल्यास बेमुदत आंदोलन स्थगित करणार
  अन्यथा आशा सेविका, गटप्रवर्तक आंदोलनावर ठाम
  राज्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तक संपावर
  संपामुळे आरोग्य यंत्रणांचं काम झालं आहे ठप्प 

  17:5 (IST)

  सलग दुसऱ्या दिवशी धारावीत रुग्णसंख्या शून्यावर
  2 दिवसांपासून धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही 

  15:2 (IST)

  कॉंग्रेस प्रभारी एच.के.पाटील 3 दिवस मुंबईत
  गुरुवार ते शनिवार प्रदेश कॉंग्रेसची बैठक
  कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांसह मंत्र्यांसोबत बैठक
  प्रदेश पातळीवर संरचनात्मक आढावा 

  13:17 (IST)

  '10 दिवसात कोरोनास्थितीचा आढावा घेणार'
  'काही ठिकाणी शाळा सुरू करण्यावर निर्णय घेऊ'
  शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
  'शालेय फी दरवाढीबाबत मंत्रिमंडळात निर्णय'
  मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार - गायकवाड 
  11वी प्रवेश परीक्षा जुलै महिन्यात - शिक्षणमंत्री
  ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केलेत - शिक्षणमंत्री

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स