कल्याण - बँक ऑफ बडोदाच्या शाखेला आग
कल्याणच्या विजयनगर परिसरातील घटना
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
अग्निशमनकडून आग विझवण्याचे प्रयत्न
21:41 (IST)
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांकडून पैसे स्वीकारून संस्थात्मक अलगीकरणातून अवैधरीत्या सूट देणारा दुय्यम अभियंता निलंबित, 3 संशयितांविरुद्ध महापालिका प्रशासनानं पोलिसात दाखल केली फिर्याद
20:55 (IST)
मुंबईतून राज्यव्यापी कोविड लसीकरणाचा शुभारंभ
उद्या मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते होणार शुभारंभ
बीकेसी संकुल कोविड केंद्रात होणार शुभारंभ
मुंबईत 9 केंद्रांवर रोज 4 हजार जणांचं लसीकरण
देशव्यापी लसीकरण मोहिमेचा उद्या शुभारंभ
कूपर रुग्णालयात मोदींच्या हस्ते व्हीसीद्वारे शुभारंभ
20:24 (IST)
उद्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ
राज्यात 285 लसीकरण केंद्रांवर तयारी पूर्ण
20:19 (IST)
नागपूर - अयोध्येतील राम मंदिर निर्माण कार्यासाठी राज्यपालांनी 1 लाख 11 हजारांचा चेक दिला तर स्वामी अवधेशानंद गिरी महाराजांनी 1 लाख रुपयांचा चेक दिला
20:10 (IST)
राम मंदिर निर्माण करतोय, रामराज्य येईल तेव्हाच आपली तपस्या पूर्ण होईल, देश योग्य दिशेनं जातोय, लवकरच देशात रामराज्य येईल यात शंका नाही -राज्यपाल
20:1 (IST)
श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियान, नागपुरात समर्पण अभियानाचा भव्य शुभारंभ, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे प्रारंभ, मंदिरासाठी सामान्य जनतेचा भावनिक सहभाग असावा, ट्रस्टतर्फे घरोघरी संपर्क करून निधी समर्पणाचा कार्यक्रम घेतला हाती
19:21 (IST)
मुंबई महापालिका आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, महापालिकेच्या नव्या परिपत्रकानुसार शाळा 16 जानेवारीपासून पुढील सूचनेपर्यंत बंद राहतील
तर राज्य सरकार म्हणतंय, 27 जानेवारीपासून 5वी ते 8 वीची शाळा सुरू होणार
19:14 (IST)
5वी ते 8 वीच्या शाळांबाबत मोठी बातमी
'प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हजेरीत शाळा भरणार'
'राज्यातील शाळा 27 जाने.पासून सुरू होणार'
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी दिली माहिती
'विद्यार्थी, शिक्षकांची कोरोनाबाबत काळजी घ्या'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली सूचना
18:25 (IST)
कोल्हापूर - पेरीडमध्ये आश्चर्यकारक निवडणूक
स्वत: उमेदवारानंही केलं नाही स्वत:ला मतदान
गावात एकाही मतदारानं केलं नाही मतदान
9 पैकी 8 जागा झाल्या बिनविरोध
एका वॉर्डात दोन उमेदवार होते रिंगणात
2 उमेदवारांपैकी एकालाही मतदान नाही
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स