Live Updates: अकोटमध्ये संचारबंदी शिथिल, जमावबंदी लागू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 14, 2021, 23:44 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:30 (IST)

  '2 वर्षांत 3 लाख 30 हजार कोटींचे औद्योगिक करार'
  गुंतवणूकदारांकडून राज्याला प्रथम पसंती - सुभाष देसाई
  उद्योगमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचं उद‌्घाटन

  21:11 (IST)

  टी-20 वर्ल्ड कपमधील मेगाफायनल
  न्यूझीलंडच्या 20 षटकांत 4 बाद 172 धावा
  ऑस्ट्रेलियासमोर 173 धावांचं आव्हान
  कोण होणार टी-20 वर्ल्ड कपचा चॅम्पियन?

  21:4 (IST)

  पनवेल - 'आम्हाला शिवसेनेसोबत सरकार करायचं नाही'
  यापुढे सेनेसोबत निवडणूक लढवायची नाही - चंद्रकांत पाटील
  'बाळासाहेबांवर प्रेम, शिवसेनेवर राजकीय प्रेम नाही'
  चंद्रकांत पाटील यांचं पनवेलमध्ये वक्तव्य
  सेनेसोबत काम करण्याची मुळीच इच्छा नाही - पाटील

  20:29 (IST)

  अंबरनाथ - चिखलोली धरणात 2 मुलं बुडाली
  अग्निशमन दलाच्या जवानांकडून दिवसभर शोध
  मात्र अजूनही मुलांचा शोध लागला नाही
  अंधार पडल्यानं जवानांनी शोधकार्य थांबवलं

  20:15 (IST)

  'रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा' मानून आरंभलेला हा आरोग्ययज्ञ अखंडितपणे सुरू राहावा हीच इच्छा, ठाणे ग्लोबल कोविड केअर सेंटरच्या जागी लवकरच कर्करोग रुग्णालय सुरू करणार, नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती, वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा चौथा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

  19:3 (IST)

  टी-20 वर्ल्ड कपमधील मेगाफायनल
  न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात महामुकाबला
  ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

  18:32 (IST)

  'जगाला साखर पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्राची'
  जगाला साखर देणारे देश अडचणीत - शरद पवार
  चांगल्या दर्जाचा ऊस निर्माण केला पाहिजे - पवार
  उतारा चांगला काढला पाहिजे - शरद पवार

  18:16 (IST)

  नाशिक - रानवड सहकारी साखर कारखान्याचा शुभारंभ
  अनेक वर्षांपासून सहकारी साखर कारखाना होता बंद
  शरद पवारांच्या हस्ते उसाची मोळी टाकून शुभारंभ
  छगन भुजबळ, बाळासाहेब पाटील, दादा भुसे उपस्थित
  'बंद पडलेला कारखाना सुरू करण्याची हिंमत दाखवली'
  शरद पवारांनी केलं आमदारांचं अभिनंदन
  'आज मोळी टाकलीय, उद्या त्याची साखर होईल'
  साखर कारखान्याच्या जन्म महाराष्ट्रात - शरद पवार
  साखर काढून हा धंदा टिकणार नाही - शरद पवार
  'वीजनिर्मिती करण्याचा विचार केला पाहिजे'
  'वीजनिर्मितीबाबत राज्यातील मंत्र्यांशी बोलू, मार्ग काढू'
  'वीजनिर्मितीसाठी कारखाने पुढे आले ही आनंदाची बाब'
  अनेक वाहनंही इथेनॉलमध्ये आणलीय - शरद पवार
  'बाहेरच्या देशात हे होतंय तर आपल्याकडे होईल'
  'इथेनॉलला दुपटीनं भाव मिळेल हे मी खात्रीनं सांगतो'
  'वीज, हायड्रोजन तयार करण्याचा प्रयत्न करता येईल'
  'शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास भरपाईची हिंमत ठेवावी'
  कारखाना हे राजकारण नाही तर हा धंदा - शरद पवार

  18:0 (IST)

  देवाचिये द्वारी, उभा क्षण भरी...
  उद्या पार पडणार कार्तिकी एकादशीचा सोहळा
  कार्तिकी एकादशीसाठी दुमदुमली पंढरी नगरी
  विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट
  झेंडू, अष्टर, शेवंतीसारख्या फुलांनी सजलं मंदिर
  एकादशीनिमित्त राज्यभरातील वारकरी पंढरपुरात
  नियम-अटींचं पालन करून सोहळा साजरा करणार
  'न्यूज18 लोकमत'च्या प्रेक्षकांसाठी विठ्ठल दर्शन
  कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला विठुरायाचं दर्शन

  17:19 (IST)

  केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन - पटोले
  'जनतेसमोर भूमिका मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलो'
  महाराष्ट्रात शांतता ठेवा, नाना पटोलेंचं आवाहन
  कोणत्याही अफवांना बळी पडू नये - नाना पटोले
  सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नका - पटोले
  ... तर राज्यातील जनता भीक घालणार नाही - पटोले
  'विधान परिषदेसाठी सक्षम उमेदवार मिळेल'
  आम्हीच विधान परिषद निवडणूक जिंकू - पटोले

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स