LIVE: शरद पवार उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 15, 2021, 19:32 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:27 (IST)

  अंबरनाथ - पोहायला गेलेली 2 मुलं बुडाली, नेवाळीच्या गणेश घाट तलावातील दुर्घटना, गावकऱ्यांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढले

  20:47 (IST)

  जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा 20 ते 25 जुलै यादरम्यान होणार, जेईई मेन परीक्षेच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षा 26, 27, 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर या दिवशी घेणार, एकूण 7 लाख 32 हजार परीक्षार्थींची जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यासाठी नोंदणी - धर्मेंद्र प्रधान

  20:40 (IST)

  गांधीनगर रेल्वे स्टेशनचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद‌्घाटन
  प्रवाशांना मिळणार एअरपोर्टसारखी सुविधा
  रेल्वे स्टेशनवर 318 खोल्यांचं फाईव्ह स्टार हॉटेल

  20:28 (IST)

  केंद्राकडून पीकविम्याला 23 जुलैपर्यंत मुदतवाढ

  20:24 (IST)

  राज्यात दिवसभरात 8,010 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 7,391 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 170 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 96.17 तर मृत्युदर 2.4 टक्के
  राज्यात सध्या 1 लाख 7,205 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:58 (IST)

  मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 545 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 505 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 13 रुग्णांचा मत्यू
  मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 948 दिवसांवर

  19:53 (IST)

  पिंपरी-चिंचवड : कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी राकेश मौर्य गजाआड, पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मौर्यला वाकडमध्ये अटक, आतापर्यंत 4 आरोपी अटकेत, इतर 5 आरोपींचा शोध

  19:24 (IST)

  उल्हासनगर - भर रस्त्यात तलवारीनं केक कापला, दोघांना अटक तर पोलिसांकडून 6 जणांचा शोध

  19:8 (IST)

  केंद्र सरकारनं कृषी पीकविम्याची मुदत वाढवली
  शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केलीय - रावसाहेब दानवे

  19:4 (IST)

  केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट
  राणेंनी गृहमंत्री अमित शाहांची निवासस्थानी घेतली भेट
  मंत्रिपदाच्या शपथेनंतर दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटीगाठी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स