Live Updates: वर्ध्यात संपकरी एसटी बस चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 15, 2021, 00:34 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:12 (IST)

  पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का, रूपाली पाटील यांचा मनसेच्या सदस्यपदाचा राजीनामा

  22:0 (IST)

  दारू पिऊन गाडी चालवणं पडणार महागात
  आता 10 हजारांचा दंड भरावा लागणार
  गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं टाळा
  मोबाईलवर बोलण्याच्या दंडातही पाच पट वाढ

  21:39 (IST)

  सर्व पात्र लोकांचं लसीकरण वेगानं पूर्ण करणार
  मुंबईत आता रात्रीही विशेष लसीकरण मोहीम
  सर्व विभागात संध्या. 6 ते रात्री 10 पर्यंत मोहीम
  एक रात्रपाळी मोबाईल चमू/लसीकरण केंद्र सुरू करणार
  आजपर्यंत 105% लोकांना लसीची पहिली मात्रा
  80% नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली
  अद्याप 20% लोकांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही
  ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होण्याचा धोका
  100% पूर्ण लसीकरण लवकर करणं अपेक्षित
  मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांचा निर्णय

  21:21 (IST)

  नवी मुंबई मनपाच्या उद्यापासून शाळा सुरू होणार
  पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार
  खासगी शाळाही सुरू करण्याचा मनपाचा निर्णय
  त्याबाबतचा सर्वाधिकार शाळा प्रशासनाला
  पालकांनाही मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नाही

  19:54 (IST)

  राज्यात ओमायक्रॉनच्या 8 नव्या रुग्णांची नोंद
  8 पैकी 7 रुग्ण मुंबईचे तर एक विरारचा रुग्ण
  8 पैकी एकाही रुग्णाला तीव्र लक्षणं नाहीत
  राज्यातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या 28 वर

  19:16 (IST)

  ठाणे महापालिकेच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
  पहिली ते 7वीच्या शाळा उद्यापासून होणार सुरू
  महापालिका आणि खासगी शाळा होणार सुरू
  कोरोना नियमांचं पालन करून शाळा सुरू होणार

  19:3 (IST)

  विरोधी पक्षाच्या एकजुटीबाबत झाली चर्चा, 12 खासदारांच्या निलंबनासंदर्भात उद्या शरद पवारांच्या नेतृत्वात बैठक, यूपीएमध्ये शिवसेना सहभागी होण्याबाबत चर्चा झाली नाही, या निर्णयाविषयी भविष्यात विचार करू - संजय राऊत

  18:49 (IST)

  मुलुंड परिसरातील 20 अनधिकृत आणि वाढीव बांधकामांवर धडक कारवाई, औद्योगिक परिसरातील 8 हजार चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम तोडलं, मुंबई पोलिसांच्या सहकार्यानं महापालिकेच्या टी विभागाची कारवाई

  18:42 (IST)

  उद्या दुपारी 3.30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक

  18:28 (IST)

  दिल्लीतून या घडीची सर्वात मोठी बातमी

  शरद पवार - सोनिया गांधींमधील बैठक संपली
  सोनियांच्या निवासस्थानी सुरू होती बैठक
  राहुल गांधीही बैठकीला होते उपस्थित
  फारुख अब्दुल्ला, संजय राऊत होते उपस्थित
  टी.आर. बालू, मल्लिकार्जुन खरगे होते उपस्थित

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स