liveLIVE NOW

LIVE: मुंबईत तूर्तास सर्वसामान्यांसाठी लोकल बंदच-विजय वडेट्टीवार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 14, 2021, 16:50 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  20:52 (IST)

  मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी 
  रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी 672 दिवसांवर
  मुंबईत दिवसभरात 529 नवीन रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 725 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 19 रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95% 

  20:16 (IST)

  पुणे - भवानी पेठ भागात आज एकही कोरोना रुग्ण नाही
  दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण न आढळल्याची पहिलीच घटना
  सुरुवातीपासून कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता भवानी पेठ
  बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात आज फक्त 2 कोरोना रुग्ण
  पुणे शहरात दिवसभरात 187 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

  20:14 (IST)

  मुंबई मनपाकडून लसीकरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वं
  लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाहिरातबाजी नको - मनपा
  'राजकीय फलक, पोस्टर, बॅनर, होर्डिंग्ज लावण्यास मनाई'
  खासगी लसीकरण केंद्रांनी सामंजस्य करार करणं अनिवार्य
  'वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णवाहिकेची उपलब्धता किती?'
  इत्यादी संदर्भात स्पष्ट उल्लेख आवश्यक - मनपा आयुक्त 

  18:15 (IST)

  नारायण राणेंची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती
  'मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणताही निरोप नाही'
  सध्या गोव्याहून मुंबईला निघालो - नारायण राणे
  निरोप आल्यास दिल्लीला जाणार - नारायण राणे 

  17:35 (IST)

  राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीवर उद्या सुनावणी
  '12 विधान परिषद सदस्यांची यादी नेमकी कुठे?'
  'राज्यपाल सचिवालयाकडे यादी आहे की नाही?'
  अनिल गलगलींच्या अपिलावर उद्या सुनावणी
  माहिती अधिकारांतर्गत अपिलावर होणार सुनावणी
  उद्याच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष  

  16:25 (IST)

  'या आठवड्यात रुग्णसंख्या,पॉझिटिव्हीटी दर 5%'
  'रुग्ण संख्या कमी मात्र कोरोना संपलेला नाही'
  लोकांनी जबाबदारीची लेव्हल सुधारावी - वडेट्टीवार
  'परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी घ्यावी'
  'काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही परिस्थिती चिंताजनक'
  तुमच्या जिल्ह्याची सुरक्षा तुमच्या हाती - वडेट्टीवार
  मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा - वडेट्टीवार
  मुंबई, ठाणे लेव्हल 3 मध्ये - विजय वडेट्टीवार
  'मुंबई लेव्हल 1 वर आल्यास लोकल सुरू करू'
  'मुंबईत तूर्तास सर्वसामान्यांसाठी लोकल बंदच'
  मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी केलं स्पष्ट


  धारावीत दैनंदिन रुग्णसंख्या प्रथमच शून्यावर
  दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदाच शून्य रुग्ण
  धारावी 0, दादर 3, माहीम 9 नवे कोरोना रुग्ण 

  14:10 (IST)


  'छत्रपतींनी मराठा समाजाला दिशा दिली'
  समाजाची दिशाभूल करणार नाही - संभाजीराजे
  अनेक विषयांवर आमच्या दोघांत एकमत - संभाजीराजे
  6 मागण्या राज्य सरकारकडे दिल्यात - संभाजीराजे
  आता लोकप्रतिनिधींनी बोलणं गरजेचं - संभाजीराजे
  आमचं घराणं आणि विचार एकच - उदयनराजे
  संभाजीराजेंच्या विचारांशी सहमत - उदयनराजे
  दुफळी निर्माण करणारं राजकारण घातक - उदयनराजे
  उद्रेक झाल्यास राज्यकर्ते जबाबदार - उदयनराजे
  'मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवा'
  आरक्षणप्रश्नी उदयनराजे भोसले यांची मागणी

  13:21 (IST)

  संभाजीराजे छत्रपती-उदयनराजेंची भेट
  पुण्यात संभाजीराजे-उदयनराजेंची बैठक
  मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व

  12:33 (IST)

  कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा
  अजित पवार-राजेश टोपेंच्या उपस्थितीत आढावा
  'कोल्हापुरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत उत्तम काम'
  संस्थात्मक विलगीकरणावर भर - अजित पवार
  कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश - अजित पवार
  'आरोग्य, ग्रामविकास विभागात कर्मचारी कमी'
  'मंत्रिमंडळाच्या बैठकीत भरतीबाबत आढावा घेणार'
  'खासगी रुग्णालयांनी जादा बिल आकारू नये'
  दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणाच्या सूचना - पवार

  12:3 (IST)

  संभाजीराजे छत्रपती घेणार उदयनराजेंची भेट
  दुपारी पुण्यात होणार संभाजीराजे-उदयनराजे भेट
  मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स