LIVE : राज्य सरकारची अवस्था म्हणजे नाचात येईन अंगण वाकडे, चंद्रकांत पाटलांची टीका

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | February 14, 2021, 17:18 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    20:0 (IST)

    नाशिक - 15वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन 25, 26 मार्चला नाशिकमध्ये होणार मात्र ठिकाण अद्याप निश्चित नाही; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार घालून नाशिकमध्ये संमेलन भरवणार; विद्रोही साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी यांची माहिती

    19:43 (IST)

    राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ
    दिवसभरात 4 हजारांपेक्षा जास्त रुग्ण
    राज्यात 4,092 नवे कोरोना रुग्ण आढळले
    दिवसभरात 1,355 रुग्णांना डिस्चार्ज
    दिवसभरात 40 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
    रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.7 टक्के
    राज्यात एकूण 36,065 अॅक्टिव्ह रुग्ण
    ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 4740 अॅक्टिव्ह रुग्ण
    मुंबईत 4193 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण 

    19:28 (IST)

    शेतकरी वर्गाची चिंता वाढवणारी बातमी 
    16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान पावसाचा अंदाज
    विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस?
    गारांसह पावसाचा कुलाबा वेधशाळेचा अंदाज 

    19:17 (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण
    पूजा चव्हाणचे वडील 'न्यूज18 लोकमत'वर
    पूजाच्या वडिलांशी एक्सक्लुझिव्ह बातचीत
    पूजा चव्हाणच्या वडिलांचं सर्वांना आवाहन
    माझ्या मुलीची बदनामी थांबवा -पूजाचे वडील
    'पोल्ट्री फार्ममधील नुकसानीमुळे तणावात'
    'पूजावर सुरू होते मानसिक उपचार'
    कोणावरही संशय नाही -पूजाचे वडील
    'पूजाचे कोणासोबतही संबंध नाहीत'
    'संजय राठोडांसोबत नाव जोडू नका'
    'कुटुंबावर कोणाचाही दबाव नाही'
    पूजा चव्हाणच्या वडिलांनी केलं स्पष्ट 

    17:49 (IST)

    पूजा चव्हाण प्रकरण गंभीर -नीलम गोऱ्हे
    'मुख्यमंत्र्यांनी चौकशीचं आश्वासन दिलंय'
    कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही -गोऱ्हे
    'पूजा चव्हाण प्रकरणाची सखोल चौकशी होणार'
    बदनामी करण्यासाठी राजकारण नको -गोऱ्हे 
    'पोलीस, न्यायव्यवस्थेला निष्कर्षासाठी वेळ द्यायला हवा' 

    17:48 (IST)

    'राज्यातील ऑटो रिक्षा सरकार वर्षभरात पंक्चर
    'अनेक मंत्र्यांच्या भानगडी आणि कारनामे उघड'
    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका 

    17:10 (IST)

    सांगली
    चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारवर टीका
    'नाचता येईना..., अशी राज्य सरकारची अवस्था'
    'कोरोनात राज्यानं एक रुपयाही कोणाला दिला नाही'
    सर्व पैसे केंद्र सरकारनं दिले आहेत -चंद्रकांत पाटील
    'जीएसटीचे सर्वात जास्त पैसे केंद्राकडून राज्याला'
    पण केंद्र पैसे देत नाही अशी ओरड सुरू -पाटील
    केंद्र सरकार पैसे देते, पण पैसे करता काय? -पाटील
    अधिवेशनात सर्व गोष्टी बाहेर काढू -चंद्रकांत पाटील
    'केंद्राकडे बोट दाखवण्याचा आघाडी सरकारचा धंदा'
    शरद पवारांच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
    पवार साहेबांवर कमी बोलायचं ठरवलं -चंद्रकांत पाटील
    'पण मी बोलल्याशिवाय पवारांना स्पष्टता मिळत नाही'
    'तुम्हाला माढा लढवण्याची भूमिका जाहीर करावी लागते'
    पुन्हा माघार घेतली, मग मुंबईला जावं लागलं -पाटील
    त्यामुळे शरद पवारांनी मला शिकवू नये -चंद्रकांत पाटील
    पक्षसूचनेनुसार कोल्हापूरऐवजी पुण्यातून लढलो -पाटील 

    16:56 (IST)

    चेन्नई कसोटीवर टीम इंडियाचं वर्चस्व
    इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांवर आटोपला
    कसोटीत आर.अश्विनला सर्वाधिक 5 विकेट‌्स
    अक्षर पटेल, ईशांत शर्माला प्रत्येकी 2 विकेट्स
    टीम इंडियाकडे 249 धावांची भक्कम आघाडी
    दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया 1 बाद 54 

    15:34 (IST)

    'उद्या राज्य सरकारविरोधात शंखनाद'
    नाशिकमध्ये शंखनाद करण्याचा इशारा
    आचार्य तुषार भोसलेंची घोषणा
    'विजय वडेट्टीवारांनी माफी मागावी'
    आचार्य तुषार भोसलेंची मागणी

    15:32 (IST)

    चेन्नई - भारत विरुद्ध इंग्लंड दुसरी कसोटी 
    इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांवर आटोपला
    टीम इंडियाकडे 195 धावांची भक्कम आघाडी
    कसोटीत आर.अश्विनला सर्वाधिक 5 विकेट‌्स
    अक्षर पटेल, ईशांत शर्माला प्रत्येकी 2 विकेट्स 

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स