• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Updates : राज्याला मोठा दिलासा, कोरोनाबाधितांची संख्या 3 हजाराखाली!

LIVE Updates : राज्याला मोठा दिलासा, कोरोनाबाधितांची संख्या 3 हजाराखाली!

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 13, 2021, 20:43 IST
  LAST UPDATED 8 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:56 (IST)

  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंची अखेर बदली
  संजय गांधी निराधार योजनेत जळगावला बदली
  आत्महत्येच्या इशाऱ्याची क्लिप झाली होती व्हायरल

  18:34 (IST)

  सहकारी संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा
  कोरोनामुळे 31 ऑगस्टपर्यंत दिली होती स्थगिती
  स्थगिती मुदत संपल्यानं निवडणुका होणार घोषित

  18:7 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोलीस मुख्यालयात
  पोलीस महासंचालकांसह इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक
  गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्य सचिवही उपस्थित
  बैठकीत राज्याच्या कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

  16:35 (IST)

  साकीनाका प्रकरणानंतर पोलीस प्रशासन सतर्क
  महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी प्रशासनाची मोहीम
  महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी नियमावली 
  निर्जन,अंधाऱ्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणार 
  क्यूआर कोड लावून पोलीस गस्त घालणार
  बीट मार्शल, गस्ती वाहने तैनात करणार 
  गर्दुल्ले, नशेबाजांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश
  सतत महिला अत्याचार करणाऱ्यां आरोपींवर करडी नजर

  16:17 (IST)

  जि.प., प.स. रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक 
  पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोबरला मतदान
  धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर जिल्हा परिषद
  त्याअंतर्गत पंचायत समित्यांचीही पोटनिवडणूक
  पालघर जिल्हा परिषद रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक
  सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबरला होणार मतमोजणी
  राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांची घोषणा

  15:16 (IST)

  मुंबई - साकीनाका बलात्कार प्रकरण
  आरोपीनं गुन्हा कबूल केलाय - हेमंत नगराळे
  गुन्ह्याचा तपास 15 दिवसांमध्ये पूर्ण होईल - नगराळे
  'गुन्ह्याचं आरोपपत्र एक महिन्यात सादर करणार'
  डीएनएचे रिपोर्ट लवकरच येतील - हेमंत नगराळे
  मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसोबत बैठक झाली - नगराळे
  'पीडित महिलेच्या मुलींना आर्थिक मदत दिली जाणार'
  'शासकीय योजना, मुख्यमंत्री निधीतून 20 लाखांची मदत'

  14:54 (IST)

  नारायण राणेंचं मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वक्तव्य प्रकरण
  नारायण राणे अलिबाग स्थानिक गुन्हे शाखेत हजर
  महाड सेशन्स कोर्टाच्या आदेशानुसार राणे हजर
  नारायण राणेंचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता

  14:42 (IST)

  किरीट सोमय्यांच्या आरोपांना हसन मुश्रीफांचं उत्तर
  'किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन'
  किरीट सोमय्यांचा तीव्र निषेध करतो - हसन मुश्रीफ
  सोमय्यांच्या सीएच्या पदवीवर संशय - हसन मुश्रीफ
  'कागल, कोल्हापुरात येऊन माहिती घ्यायला हवी'
  'साखर कारखान्यात हजारो शेतकऱ्यांची गुंतवणूक'
  माझ्या घरावरील धाडीत काही मिळालं नाही - मुश्रीफ
  सोमय्यांनी हवी तिथे खुशाल तक्रार करावी - मुश्रीफ
  'मविआ सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपचे आरोप'
  'सोमय्यांच्या आरोपांमुळे भाजपची प्रतिमा मलीन'
  सोमय्यांवर अब्रूनुकसानीचा दावा करणार - मुश्रीफ
  सोमय्यांवर 100 कोटींचा दावा करणार - मुश्रीफ
  शाहांच्या मैत्रीमुळे चंद्रकांतदादांना पद - हसन मुश्रीफ
  चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरात स्थान नाही - मुश्रीफ
  कोल्हापुरात भाजप सपाट झालं - हसन मुश्रीफ
  'रस्ते घोटाळ्याबाबत चंद्रकांतदादांची तक्रार करणार'
  कोल्हापुरात भाजपचा निश्चित पराभव होणार - मुश्रीफ

  12:43 (IST)

  दिल्लीच्या सब्जी मंडी परिसरात मोठी दुर्घटना
  सब्जी मंडी परिसरात 5 मजली इमारत कोसळली
  अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता
  युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू  

  12:30 (IST)

  मुंबई-साकीनाक्यातील लैंगिक अत्याचार प्रकरण
  'सामनातून कठुआ, हाथरस प्रकरणाची आठवण'
  महाराष्ट्रात कायद्याचंच राज्य आहे - सामना
  नराधमांवर कठोर कारवाईचं आश्वासन
  मुंबईत 'जौनपूर पॅटर्न'नं घाण केली - सामना
  'सामना'तून योगी सरकारलाही धरलं धारेवर 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स