• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Updates: पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्याला बीड प्रशासनाची परवानगी

LIVE Updates: पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्याला बीड प्रशासनाची परवानगी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 13, 2021, 17:30 IST
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:21 (IST)

  राज्य महिला आयोगाला मिळाल्या नव्या अध्यक्ष
  राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांची नियुक्ती
  उद्या होणार अधिकृत घोषणा, सूत्रांची माहिती

  20:16 (IST)

  आरोपी किरण गोसावीविरोधात लूकआऊट नोटीस
  पुणे पोलिसांनी काढली लूकआऊट नोटीस
  2018 मध्ये किरण गोसावीवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा
  आर्यन ड्रग्ज कारवाईत एनसीबीचा पंच बनला होता
  मलिकांकडून वादग्रस्त गोसावीच्या पंचगिरीला आक्षेप

  19:13 (IST)

  भिवंडी-निजामपूर पालिकेतील काँग्रेस नगरसेवकाला अटक, 50 लाखांची लाच घेताना ठाणे एसीबीची कारवाई

  18:52 (IST)

  माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 'एम्स'मध्ये
  मनमोहन सिंगांना एम्स रुग्णालयात केलं दाखल

  18:47 (IST)

  'एसटीला पर्यावरणपूरक गाड्यांसाठी देणार 140 कोटी'
  '1 हजार गाड्यांचं सीएनजीमध्ये करणार रूपांतर'
  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

  18:21 (IST)

  जळगाव - एकाच दिवसात शिवसेनेला दुसरा धक्का
  भाजपमधून फोडलेले 10 नगरसेवक पुन्हा स्वगृही
  अजून 3 नगरसेवक पुन्हा भाजपच्या वाटेवर?
  जळगाव जिल्हा बँक सर्वपक्षीय पॅनल फुटलं
  गुलाबराव पाटलांना काँग्रेसचा घरचा आहेर

  18:17 (IST)

  शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून मनसेची टीका
  'नाट्यगृहं, चित्रपटगृहं 22 तारखेला सुरू होतायत'
  'सेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंदमध्ये साजरा होतोय'
  सरकार म्हणून परवानगी दिली का? - अमेय खोपकर
  'मनसेकडून निषेध, आयोजकांविरुद्ध तक्रार करणार'

  17:34 (IST)

  आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
  उद्या सेशन्स कोर्टात पुन्हा होणार सुनावणी
  आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच

  17:5 (IST)

  देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर घणाघात
  'यूपीच्या घटनेबाबत महाराष्ट्रात बंद करतात'
  'पोलीस संरक्षणात राज्यकर्त्यांचा लोकांवर दबाव'
  'बंद किती शांततेत झालाय सर्वांना माहीत आहे'
  बंद हा राज्य सरकार पुरस्कृत होता - फडणवीस
  पवारांचा कोर्टावर विश्वास आहे का नाही? - फडणवीस
  तपास यंत्रणांवरून देवेंद्र फडणवीसांचा सवाल
  'हायकोर्टाच्या आदेशावरून देशमुखांवर कारवाई'
  तपास यंत्रणांना चुकीची वागणूक दिली - फडणवीस
  मी सलग 5 वर्षं मुख्यमंत्री होतो - देवेंद्र फडणवीस
  विरोधी पक्षनेते फडणवीसांचा शरद पवारांना टोला
  मी विरोधी पक्षनेता म्हणून समाधानी - फडणवीस
  ...म्हणून 'मविआ'चा जळफळाट - फडणवीस
  दलालांचं नेटवर्क आता उद‌्ध्वस्त करावं - फडणवीस

  16:31 (IST)

  जळगाव महापालिकेत राजकीय उलथापालथ, जळगावात भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का, 10 बंडखोर नगरसेवक पुन्हा स्वगृही परतले, गिरीश महाजनांच्या कार्यालयात आमदार सुरेश भोळेंच्या उपस्थितीत नगरसेवकांची घरवापसी, जळगाव मनपात बहुमत असल्याचा भाजपचा दावा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स