LIVE : उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, 2 जण गंभीर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 13, 2021, 19:18 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:44 (IST)

  'प्रत्येक मंत्र्यानं जनतेला काहीना काही दिलं पाहिजे'
  '25 वर्षांनंतर मविआचं नाव लक्षात राहिलं पाहिजे'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व मंत्र्यांना दिला सल्ला

  20:33 (IST)

  मुंबई आयलँडिंगच्या विविध प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून तत्वत: मान्यता, मुंबईची 2024 पर्यंतची विजेची गरज लक्षात घेता
  वीजनिर्मिती तसेच वीजपुरवठ्याचे प्रकल्प गतीनं मार्गी लावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  19:53 (IST)
  जलक्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक व्यक्तींबरोबर धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार व्हावा - अशोक चव्हाण
  19:52 (IST)

  कायम बदनामी करण्यात येणारं खातं म्हणून जलसंपदा या विभागाकडे पाहिलं जातं, दुष्काळमुक्तीचं एक मोठं काम उभं राहत आहे - जयंत पाटील

  19:51 (IST)

  सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, सीएनजीत 2.58 तर पीएनजीत 55 पैशांची वाढ

  18:39 (IST)

  नाशिक - वऱ्हाडाच्या गाडीला अपघात
  पिकअप व्हॅन पुलावरून नदीपात्रात कोसळली
  अपघातात दोघांचा मृत्यू, 8 ते 10 जण जखमी
  नाशिकच्या निफाड तालुक्यातील घटना

  17:54 (IST)

  मुंबईत बहुमजली कारागृह बांधण्यात येणार; मुंबई, पुणे, गोंदिया, पालघर इथं नवीन कारागृह बांधणार

  17:49 (IST)

  औरंगाबाद प्राणिसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं, परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवावा - मुख्यमंत्री

  17:25 (IST)

  टोकियोत 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिक
  ऑलिम्पिक चमूत 126 खेळाडू सहभागी होणार
  पंतप्रधान मोदींचा ऑलिम्पिक खेळाडूंशी संवाद
  टोकियो ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना शुभेच्छा
  'ऑलिम्पिकमध्ये मेडल्स जिंकून आणा'
  ऑलिम्पिकच्या खेळाडूंना मोदींचा कानमंत्र
  महाराष्ट्रातील प्रवीण जाधवच्या कुटुंबाशीही संवाद

  17:16 (IST)

  UPSCच्या धर्तीवर राज्यात MPSCच्या परीक्षांचं वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याच्या सूचना बैठकीत अजित पवारांनी MPSCला दिल्या आहेत, 15711 पदांच्या भरतीची प्रक्रियाही लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत - दत्ता भरणे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स