Live Updates : गोव्यात शिवसेना-काँग्रेस आघाडी होणार नाही - आठवले

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 13, 2022, 20:53 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:55 (IST)

  देहविक्री व्यवसायातील महिलांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय; अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची घोषणा

  21:53 (IST)

  राज्यात दिवसभरात 46,406 नव्या रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

  21:50 (IST)

  मंत्रालयासमोरची मंत्र्यांची शासकीय निवासस्थानं गडकिल्ल्यांच्या नावानं, उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांची ट्विटद्वारे माहिती

  20:28 (IST)

  कोरोना च्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी पालिका सज्ज नागरिकांनी खबरदारी बाळगा पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांचे आवाहन.

  - वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आज अनिलकुमार पवार  यांनी पदभार स्वीकारला

  - सध्या ११०० रुग्णाचा इंफ्लो असला तरी २८८० बेड उपलब्ध

  -ऑक्सिजन ची उपलब्धता ८९ मेट्रिक टन तर लिक्विड ऑक्सिजनची ६३ मेट्रिक टन

  - दुसऱ्या लाटेचा विचार केला तर २५ मेट्रिक टन ऑक्सिजन जास्तीत जास्त लागला होता मात्र आता आपल्याकडे त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन उपलब्ध 

  20:17 (IST)

  पुण्यात दिवसभरात 5571 नवीन रुग्णांची नोंद
  पुण्यात दिवसभरात 2335 रुग्णांना डिस्चार्ज
  पुणे शहरात कोरोनाच्या 2 रुग्णांचा मृत्यू
  सक्रिय रुग्णांपैकी केवळ 4.33% हॉस्पिटलमध्ये

  19:59 (IST)

  'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' चित्रपट
  'चित्रपटाच्या प्रोमोतील आक्षेपार्ह दृश्यं हटवली'
  दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी स्पष्ट केली भूमिका
  'जुना प्रोमो हटवून सुधारित प्रोमो प्रदर्शित करणार'
  भावना दुखावल्यास दिलगिरी - महेश मांजरेकर

  18:56 (IST)

  कोरोना आढावा घेण्यासाठी मोदींची बैठक - टोपे
  राज्यासाठी लसींच्या पुरवठ्याची मोदींकडे मागणी
  'महाराष्ट्राबाबत सर्व गोष्टी लेखी पाठवल्या होत्या'
  राज्यात कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा - टोपे
  घरी होणाऱ्या टेस्टिंगची आकडेवारी नाही - टोपे
  कोरोना टेस्ट किटची नोंदणी बंधनकारक - टोपे
  'आपल्याकडे लसीकरण हा सध्या एकमेव उपाय'
  नव्या लसीकरण धोरणामुळे अधिक साठ्याची मागणी
  ज्यांना लसीकरण नकोय, केंद्रानं उपाययोजना कराव्यात
  अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे व्हेरियंट - राजेश टोपे
  'महाराष्ट्रात ओमायक्रॉन 1700, डेल्टा 2700'
  राज्यात 70 टक्के डेल्टा व्हेरियंट - राजेश टोपे

  18:44 (IST)

  द.आफ्रिका विरुद्ध भारत तिसरी कसोटी
  ऋषभ पंतची झुंजार शतकी खेळी
  ऋषभ पंतचं कारकीर्दीतलं चौथं शतक

  18:39 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, कोरोनाच्या आव्हानावर मात करून आरोग्याचा गोडवा वाढवूया

  18:36 (IST)

  इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा, नागपूरची बॅडमिंटनपटू मालविका बनसोडकडून सायना नेहवाल पराभूत; 21-7, 21-9 असा 2 गेममध्ये मिळवला विजय

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स