Live Updates: दीपक दळवींवरील शाई हल्ल्याचा अजित पवारांकडून तीव्र निषेध

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 13, 2021, 23:17 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:24 (IST)

  राज्यात आज 2 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले
  पुण्यात एक, लातूरमध्ये एक ओमायक्रॉनचा रुग्ण

  21:18 (IST)

  सोहेल खानची पत्नी सीमा खान कोरोनाबाधित
  संजय कपूरची पत्नी महीप कपूरलाही लागण

  21:17 (IST)

  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर होम क्वारंटाईन
  पालिकेकडून 7 दिवस होम क्वारंटाईनच्या सूचना
  2 दिवसांपूर्वी करिनाची टेस्ट आली पॉझिटिव्ह
  अपार्टमेंटचा पहिला मजला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर
  करिना कपूरच्या 2 मुलांची करण्यात आली टेस्ट
  महिला, घर कामगार, ड्रायव्हरचीही कोरोना टेस्ट
  करिना कपूरला सौम्य लक्षणं असल्याची माहिती

  20:5 (IST)

  'राहुल गांधींच्या रॅलीला परवानगी मिळावी'
  28 डिसेंबरला शिवाजी पार्कवर होणार रॅली
  मुंबई काँग्रेसकडून हायकोर्टात रिट याचिका
  उद्या दुपारनंतर मुंबई हायकोर्टात सुनावणी
  तयारी, रॅलीसाठी परवानगीची कोर्टाला विनंती
  28 डिसेंबरला काँग्रेसचा 137 वा स्थापना दिवस
  राहुल गांधी स्थापनादिनी मुंबईत हजर राहणार

  19:4 (IST)

  'म्हाडाच्या परीक्षा आता TCS संस्थेअंतर्गत होणार'
  पारदर्शकता हा यामागचा मुख्य उद्देश - आव्हाड
  याआधीच्या परीक्षा यासाठीच रद्द केल्यात - आव्हाड
  प्रामाणिक, हुशार, गरीब घरातून आलेले विद्यार्थी
  'त्या' विद्यार्थ्यांचा यावर हक्क आहे - जितेंद्र आव्हाड
  आपण तो हक्क हिरावून घेऊ शकत नाही - आव्हाड
  दलालांना पैसे दिलेत त्यांची नावं पुढे आणा - आव्हाड
  दलालांना आम्ही धडा शिकवू - जितेंद्र आव्हाड

  18:55 (IST)

  श्रीनगरच्या पाटणा चौक परिसरातील घटना
  पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला
  बसमधून प्रवास करत असताना भ्याड हल्ला
  हल्ल्यात 2 पोलीस शहीद, 12 पोलीस जखमी

  18:19 (IST)

  वांद्रे (पश्चिम) विभागात दिनांक 15, 16 डिसेंबरला कमी दाबानं पाणीपुरवठा

  18:15 (IST)

  उद्या सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावर सुनावणी
  'राजकीय आरक्षण बहाल होईपर्यंत निवडणुका नको'
  सरकारच्या वतीनं हीच भूमिका मांडणार - नाना पटोले
  'राजकीय आरक्षण कायम ठेवूनच निवडणुका व्हाव्यात'

  18:7 (IST)

  नागपूर शहरात सामूहिक बलात्काराची घटना
  गायक तरुणीवर अत्याचार झाल्याचं उघड
  2 आरोपींनी रामदासपेठ भागातून केलं अपहरण
  कळमना इथं नेऊन बलात्कार केल्याची माहिती

  18:2 (IST)

  ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा पहिला बळी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स