LIVE : कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील घर कोसळलं, 1 जण जखमी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 13, 2021, 17:16 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:12 (IST)

  राज्यात डेल्टा प्लसची रुग्णसंख्या 66 वर
  जळगावात डेल्टाचा धोका, सर्वाधिक 13 रुग्ण
  19 ते 45 वयोगटात संसर्गाची सर्वाधिक लागण
  महिला-पुरुष रुग्णांची संख्या जवळपास सारखी
  ज्यांनी दोन्ही डोस घेतले असे डेल्टाचे 10 रुग्ण
  राज्यात डेल्टा प्लसमुळे आतापर्यंत 5 मृत्यू 
  31 जणांना डेल्टाची कुठलीही लक्षणं नाहीत

  18:5 (IST)

  'मार्मिक'चा 61वा वर्धापन दिन ऑनलाईन सोहळा
  'मार्मिक'च्या वर्धापनदिनी शिवसैनिकांना मार्गदर्शन
  राज्यावर 2 वर्षांपासून कोरोनाचं संकट - मुख्यमंत्री
  संकटातही महाराष्ट्र पुढे चाललाय - उद्धव ठाकरे
  'व्यवसायाकडे वळण्याचा दृष्टिकोन 'मार्मिक'नं दिला'
  'व्यंगचित्र साप्ताहिक सुरू करणं आव्हानात्मक होतं'
  रेघोट्या म्हणजे व्यंगचित्र नव्हे - उद्धव ठाकरे
  'मराठी माणूस अन्याय सहन करत नाही, लढा देतो'
  'मार्मिक व शिवसेना मराठी माणसाच्या लढ्यासाठी'

  17:36 (IST)

  उद्धव ठाकरे - प्रवीण दरेकरांची 'सह्याद्री'वर चर्चा
  15 ते 20 मिनिटं दोघांची बंद दाराआड चर्चा
  'न्यूज18 लोकमत'ला विश्वसनीय सूत्रांची माहिती
  उद्धव ठाकरे - प्रवीण दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा
  पूरग्रस्तांना मदतीचा चेक दिल्यानंतर झाली चर्चा
  काय चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता

  17:17 (IST)

  पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतर वाद
  उदय सामंत रानडे इन्स्टिट्यूटला उद्या देणार भेट
  दौऱ्याआधीच विद्यापीठाकडून निर्णयाला स्थगिती
  एकत्रीकरण आणि स्थलांतर दोन्ही निर्णय रद्द
  उद्या उदय सामंत विद्यार्थ्यांशी करणार चर्चा
  त्याआधीच पुणे विद्यापीठाकडून निर्णय स्थगित
  'न्यूज18 लोकमत'नं दाखवली होती बातमी

  16:48 (IST)

  ड्रग्ज तस्करांकडून एनसीबी अधिकाऱ्यांवर गोळीबार
  ड्रग पेडलरच्या हल्ल्यात 5 अधिकारी जखमी
  परदेशी हत्यारांसह एक कोटीचे अंमली पदार्थ जप्त
  वाशी, नवी मुंबईतील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
  टोळीप्रमुखाला अटक करण्यात एनसीबीला यश

  16:43 (IST)

  कोल्हापूर - राधानगरीच्या सिरसे इथं घर कोसळलं
  घराच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकले
  एक गंभीर जखमी तर 5 जण किरकोळ जखमी
  ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाला बाहेर काढलं

  16:27 (IST)

  कोल्हापूर - पूरग्रस्त काढणार मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकार घेणार, माजी खासदार राजू शेट्टींची घोषणा, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 23 ऑगस्टला काढणार मोर्चा; शेतकरी, पूरग्रस्त, यंत्रमागधारक मोर्चात सहभागी होणार

  16:14 (IST)

  हायकोर्टाचा निकाल मी थोडा समजून घेतला, स्पष्ट आदेश नाही, तरीही राज्यपालांनी समजून घेतलं पाहिजे, इतका काळ तुम्ही आमदारकी नाकारली, हक्क नाकारले, राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा असा अर्थ त्यातून दिसतो - बाळासाहेब थोरात

  16:10 (IST)

  राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील - मलिक
  राज्यपाल हे संविधानिक पद आहे - नवाब मलिक
  'राजकीय पक्षाच्या नेत्याप्रणानं वागू नये ही अपेक्षा'

  15:51 (IST)

  चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद

  या प्रकरणातील आरोपी हे दुसरे तिसरे कोणी नसून माजी मंत्री संजय राठोडच आहेत.
  पूजा चव्हाण प्रकरणातही पुणे पोलीस अजूनही गप्प का आहेत.
  पूजा चव्हाण प्रकरणी अजूनही कारवाई का होत नाही.
  संजय राठोड यांच्या विरोधातील तक्रारींची दखल का घेतली जात नाही?
  यवतमाळ प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, तीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून पोलिसांनी आरोपींवर तात्काळ कारवाई करावी.
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या आमदारांनाच भेटत नाहीत तर मला कुठून भेटतील.

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स