• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE: घाटकोपरमधील ती कार 12 तासांनी काढली बाहेर

LIVE: घाटकोपरमधील ती कार 12 तासांनी काढली बाहेर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 13, 2021, 23:03 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:18 (IST)

  मुंबई - घाटकोपरमध्ये विहिरीत पडली होती कार
  स्लॅब खचल्यानं कारला मिळाली होती जलसमाधी
  12 तासांच्या प्रयत्नानंतर कार बाहेर काढण्यात यश 

  16:22 (IST)

  'मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून काय निष्पन्न होणार'
  'संसदेत खासदारांनी आवाज उठवला तर फायदा होईल'
  'सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता सर्व अधिकार केंद्राचे'
  'आरक्षणाबाबत पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा केली आहे'
  'पंतप्रधानानी भूमिका घेतली तर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल'
  मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया 

  16:15 (IST)

  'लोणावळ्यात 26, 27 जूनला OBC नेत्यांचं शिबीर'
  नुकतंच रद्द झालेलं आरक्षण ही पार्श्वभूमी - वडेट्टीवार
  'ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत दिशा ठरवणार'
  मागासवर्गीय आयोगाची नेमणूक केली आहे - वडेट्टीवार
  कुठल्याही संघटनेला विरोध नाही - विजय वडेट्टीवार
  'आरक्षण मर्यादा वाढवणे, घटना दुरुस्ती हाच मार्ग'
  'OBC समाजाची स्वतंत्र जातनिहाय गणना व्हावी'
  मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य
  '8 दिवसांत परिस्थिती पाहून लोकलबाबत निर्णय'
  निर्बंध शिथिल करताच संख्या वाढली - वडेट्टीवार 

  15:2 (IST)

  आषाढी वारी पायी नेण्यासंदर्भात बैठक संपन्न
  आळंदीचे विश्वस्त आणि सोहळा प्रमुखांमध्ये बैठक
  एकमत न झाल्यानं बैठकीत कोणताही तोडगा नाही
  विश्वस्तांकडून राज्य सरकारच्या निर्णयाचं समर्थन
  मानकरी मात्र पायी वारी नेण्याच्या भूमिकेवर ठाम
  आज किंवा उद्या पुन्हा बैठक होण्याची शक्यता

  14:4 (IST)

  शिवसेनेकडेच 5 वर्षं मुख्यमंत्रिपद - संजय राऊत
  'मविआ सरकार 5 वर्षं टिकलं तर हे शक्य'
  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचं राऊतांना प्रत्युत्तर
  'मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी पॅड बांधून तयार'
  पटोलेंची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपलेली नाही - दरेकर

  12:40 (IST)

  राजेश टोपे, अजित पवार उद्या कोल्हापूर दौऱ्यावर
  'अजित पवार-राजेश टोपेंचा कार्यक्रम उधळणार'
  सकल मराठाचे सचिन तोडकर यांचा इशारा
  2,185 विद्यार्थ्यांची नियुक्तीपत्रं देण्याची मागणी

  11:37 (IST)

  मराठा आरक्षण जनजागृतीसाठी दौरा
  विनायक मेटे करणार राज्याचा दौरा
  'कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार निष्क्रिय'
  मराठा समाजाचं मोठं नुकसान - विनायक मेटे
  जिल्हाभर मराठा मेळावे घेणार - विनायक मेटे
  महसूल कार्यालयांवर मोर्चे काढणार - मेटे
  'आमचं आंदोलनं मूक नाही तर बोलकं असणार'
  औरंगाबादेत शिवसंग्रामचा पहिला मेळावा - मेटे
  'औरंगाबादमध्ये 26 जून रोजी मोठा मेळावा'
  शाहू महाराज स्मृतीनिमित्त मेळावा - मेटे
  'आरक्षणासाठी कायदेशीर तज्ज्ञ समिती नेमणार'
  समितीच्या सल्ल्यानुसार कायदेशीर लढा - मेटे
  7 जुलैपासूनचं अधिवेशन चालू देणार नाही - मेटे
  सत्ताधारी मराठा आमदारांनी पाठिंबा द्यावा - मेटे
  'मुंबईत 27 जूनला 10 हजार मोटारसायकलची रॅली'

  10:2 (IST)

  ठाणेकरांची खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी
  रविवार असल्यानं नागरिक खरेदीसाठी बाहेर
  गर्दीतही नागरिकांना मास्कचा विसर

  9:9 (IST)

  उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री उद्या कोल्हापुरात
  कोरोना रुग्ण वाढत असल्यानं घेणार बैठक
  उद्या जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक 

  9:9 (IST)

  पावसात मुंबईतील नालेसफाईची पोलखोल
  चांदिवलीच्या संजयनगरात साचलं होतं पाणी
  नालेसफाईवरून आमदार दिलीप लांडे आक्रमक
  आमदार लांडेंनी कंत्राटदाराला बसवलं कचऱ्यात

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स