नाशिकहून जळगावकडे भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने जळगावकडून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकला बस चालकाने एरंडोल गावाजवळ जोरदार धडक दिली. यात बसच्या समोरील काचा फुटल्या असून ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला आहे. यात ट्रक चालक जखमी असून सुदैवाने यात कुठलीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र अपघात झाल्यावर काहीवेळ वाहतुकीच्या लांबच-लांब रांगा महामार्गावर पाहावयास मिळाल्या. यावेळी पोलिसांनी क्रेनच्या साह्याने ट्रक व बसला बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आणि बसमधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये बसवून जळगावकडे रवाना केले. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.