• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE: मोठी बातमी : मरीन ड्राईव्ह येथे उभारणार मराठी भाषा भवन; राज्य शासनाने काढला अध्यादेश

LIVE: मोठी बातमी : मरीन ड्राईव्ह येथे उभारणार मराठी भाषा भवन; राज्य शासनाने काढला अध्यादेश

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 12, 2021, 16:14 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:54 (IST)

  देशभरात 12 सप्टेंबरला होणार नीट परीक्षा
  केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
  कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलली होती नीट परीक्षा
  उद्या संध्याकाळी 5 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया
  NTA वेबसाईटच्या माध्यमातून अर्जप्रक्रिया सुरू होईल

  21:30 (IST)

  भारताच्या प्रयत्नांना मोठा धक्का
  चोक्सीला डॉमिनिक सुप्रीम कोर्टाकडून जामीन
  मेहुल चोक्सी आता अँटिगामध्ये परत जाणार

  20:51 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना फोन, उपनगरीय लोकलसेवा सुरू करण्याबाबत केली चर्चा, लोकल सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन

  20:50 (IST)

  मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना फोन
  उपनगरीय लोकलसेवा सुरू करण्याबाबत केली चर्चा
  'लोकल सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊ'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं प्रवीण दरेकरांना आश्वासन

  20:5 (IST)

  एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
  MPSCच्या रखडलेल्या नियुक्त्या मार्गी लागणार
  SEBC आरक्षण वगळून नवीन बिंदू नामावली जाहीर
  एमपीएससी लवकरच नियुक्त्या जाहीर करणार
  वेळापत्रकही जाहीर होण्याचा मार्ग मोकळा
  एमपीएससीकडूनच तसं प्रसिद्धीपत्रक जारी
  'न्यूज18 लोकमत'नं केला होता पाठपुरावा

  19:24 (IST)

  राज्यात दिवसभरात 15,277 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 7,603 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 53 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 96.15 तर मृत्युदर 2.4 टक्के
  राज्यात सध्या 1 लाख 8,343 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:0 (IST)

  पुणे - वाहन चोरी प्रकरणात संशयित दाम्पत्याला चौकशीसाठी घेऊन जात असताना दाम्पत्यानं पुणे गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण, घेतला हाताला चावा, याप्रकरणी आरोपी उद्धव भोसलेला अटक तर पत्नीला हजर राहण्याबाबत दिल्या सूचना, लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  18:35 (IST)

  'राज्याचा दौरा करून समाजाची भावना समजून घेतोय'
  दौरा झाल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार - संजय राठोड
  समाजाची भावना, समस्या मांडणार - संजय राठोड

  18:26 (IST)

  'मुंबईतील मेट्रो कामांबाबतचा बैठकीत आढावा'
  'विविध प्रकल्पांतील अडचणी युद्धपातळीवर दूर करू'

  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
  'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांना खीळ'
  मात्र सर्व अडचणी दूर करण्यात येतील - एकनाथ शिंदे
  'हे प्रकल्प लोकांसाठी खुले करण्याचा आमचा प्रयत्न'
  'मविआ' सीएमच्या नेतृत्वाखाली काम करतंय - शिंदे
  आमच्यात कसलेही मतभेद नाहीत - एकनाथ शिंदे
  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र - एकनाथ शिंदे
  'तिसरी लाट येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करतोय'
  त्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जातायत - शिंदे
  घाईगडबडीत निर्बंध शिथिल होणार नाहीत - एकनाथ शिंदे

  18:14 (IST)

  माझ्या वक्तव्याचा विपर्यास - नाना पटोले
  'वक्तव्यावर वादळ उठण्याचं काही कारण नाही'
  पाळत वगैरे हा विषय नव्हता - नाना पटोले
  'वेगळा अर्थ काढून भाजपचा राजकारणाचा प्रयत्न'
  'मविआ'वर कोणताही परिणाम होणार नाही - पटोले

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स