Live Updates : मेहता पब्लिकेशनचे संचालक सुनील मेहता यांचे निधन

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 12, 2022, 18:04 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:49 (IST)

  नवी मुंबईत दिवसभरात 2241 कोरोना रुग्ण

  नवी मुंबईत दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू

  21:31 (IST)

  भायखळ्याच्या मदनपुरा भागातील आग नियंत्रणात
  4 दुकानं, 2 गोडाऊनमधील साहित्य जळून खाक
  अग्निशमनच्या जवानांना आग विझवण्यासाठी अडचणी
  आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट नाही
  आगीत मोठं आर्थिक नुकसान, जीवितहानी नाही

  21:25 (IST)

  भाजप केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक
  सकाळी 10 वाजता भाजप मुख्यालयात बैठक
  यूपीतील पहिल्या 3 टप्प्यातील उमेदवार ठरणार?
  नरेंद्र मोदी, अमित शाह बैठकीला उपस्थित राहणार
  नितीन गडकरी, जे.पी. नड्डाही उपस्थित राहणार

  20:52 (IST)

  राज्यात दिवसभरात 46 हजार 723 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  राज्यात 28 हजार 41 रुग्णांना डिस्चार्ज

  20:40 (IST)

  '1-2 दिवसाच्या कमी रुग्णसंख्येवरून बेसावध नको'
  जिल्हा प्रशासनानं लसीकरण वाढवावं - मुख्यमंत्री
  'जिल्हा प्रशासनानं सुविधा तयार ठेवाव्यात'
  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे निर्देश

  20:27 (IST)

  पुणे पोलीस दलातील 48 जणांना कोरोनाची लागण
  2 डोस घेतलेले असल्यानं फक्त 4 जण रुग्णालयात
  कोरोना प्रसारामुळे पोलीस दलाच्या कामकाजावर ताण

  20:9 (IST)

  दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरी कसोटी
  आफ्रिकेचा पहिला डाव 210 धावांवर गुंडाळला
  भारताकडे 13 धावांची नाममात्र आघाडी
  किगन पिटरसनची 72 धावांची एकाकी झुंज
  जसप्रीत बुमराला सर्वाधिक 5 विकेट्स
  शार्दूल 1 तर यादव, शमीला प्रत्येकी 2 विकेट्स

  20:2 (IST)

  मोदींचा ताफा ठरवून अडवण्यात आला - फडणवीस
  पंजाब प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
  10 किमीवर पाकिस्तानची बॉर्डर - देवेंद्र फडणवीस
  मोदी पाकिस्तानी तोफखान्याच्या रेंजमध्ये - फडणवीस
  आम्हाला घटनेचे पुरावे मिळाले आहेत - फडणवीस

  19:20 (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 1549 नवे रुग्ण
  नाशिकमध्ये 1160 रुग्ण बरे, एकाचा मृत्यू

  19:19 (IST)

  पुण्यात दिवसभरात 4857 नव्या रुग्णांची भर
  पुण्यात दिवसभरात 1805 रुग्णांना डिस्चार्ज
  पुणे शहरात कोरोनाच्या एका रुग्णाचा मृत्यू

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स