नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षितेत वाढ
नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळ्खल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व गेल्या अनेक महिन्यांपासून एकनाथ शिंदे करत आहेत . यामध्ये अनेक नक्षलवाद्यांवर कारवाह्या देखील करण्यात आल्या. यामुळेच नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे याना वारंवार धमकीचे फोन व पत्र येत आहेत. त्यात आज गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी ट्विट करून एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे तरी सुरक्षेत वाढ करावी अशा सूचना केल्या आहेत