Live Updates: नवी मुंबईतील वाशी शहरातील बत्ती गुल, ट्रान्सफॉर्मर जळाल्याने वीजपुरवठा खंडित

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | December 12, 2021, 23:26 IST |
    LAST UPDATED A YEAR AGO

    हाइलाइट्स

    21:44 (IST)

    नाशिक शहरात टवाळखोरांचा धुमाकूळ, टोळक्याकडून तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला, पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नाशिकच्या सिडको भागातील धक्कादायक घटना

    21:25 (IST)

    ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही, ओबीसी आरक्षण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ज्येष्ठ विधिज्ञ आणि छगन भुजबळांमध्ये पार पडली बैठक

    21:6 (IST)

    मुंबई पालिकेत परिवर्तन करायचं आहे - फडणवीस
    पालिकेला भ्रष्टाचारातून मुक्त करायचंय - फडणवीस
    आपल्या सर्वांचा एकच संकल्प असावा - फडणवीस
    '2024 ला राज्यात स्वबळावर सत्ता आणायची आहे'
    फडणवीसांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
    'पक्षस्थापनेपासून पीएमपदाचे उमेदवार म्हणून पाहिलं जातं'
    'पण आजवर 10 च्यावर खासदार निवडून आलेले नाहीत'
    तरीदेखील पीएमपदाचं स्वप्न बघू शकतात - फडणवीस
    स्वप्न बघायला काही हरकत नाही - देवेंद्र फडणवीस

    20:52 (IST)

    कोरोना काळात अनेक शाखांना लागलेलं टाळं - फडणवीस
    'अतुलजी आपल्या भागातील लोकांना अन्नधान्य देत होते'
    'सर्व माता-भगिनींना पायावर उभं करण्याचं काम केलं'
    एकीकडे मतदारांच्या समस्या सोडवत होते - फडणवीस
    'पण त्याचबरोबर सरकारला धारेवरसुद्धा धरत होते'
    अतुलजींनी सरकारची लक्तरं वेशीवर टांगली - फडणवीस
    दहिसरची बोईसर नदी स्वच्छ होईल - देवेंद्र फडणवीस
    'मनपाच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा कशी स्वच्छ होणार?'
    'विरोधी पक्षनेतेपद न मिळण्यासाठी क्लृप्त्या केल्या'
    'झोपडीवासीयांना द्यायला घरं मिळतील असं वाटत नाही'
    मविआ सरकार हलत नाही, डुलत नाही - फडणवीस
    'निवडणुका आल्या की भावनिक डायलॉगबाजी होईल'
    मुंबई महापालिकेत परिवर्तन करायचंय - फडणवीस
    महापालिकेला भ्रष्टाचारातून मुक्त करायचंय - फडणवीस

    18:8 (IST)

    परिवहन विभागाची सोमवारी महत्वाची बैठक
    उद्या संध्या. 6.30 वा. कोर्टाच्या निर्देशानुसार बैठक
    निलंबन कारवाईच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक
    सोमवारी कामावर येणाऱ्यांचं निलंबन मागे घेणार

    17:38 (IST)

    मविआ सरकारचं मला आश्चर्य वाटतं - देवेंद्र फडणवीस
    'परीक्षा जाहीर करतं आणि एकही परीक्षा धड घेत नाही'
    परीक्षाच्या पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत - फडणवीस
    या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे - फडणवीस
    'अजब सरकार, मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे'
    सर्व पेपरफुटीची CBI चौकशी करा - देवेंद्र फडणवीस

    17:4 (IST)

    मुंबई - आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचं वाटप
    गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त दहिसर इथं कार्यक्रम
    'गरीबांच्या सेवेसाठी आजचा दिवस निवडल्याचा आनंद'
    गोपीनाथजींनी ओबीसींना जागृत केलं - फडणवीस
    राज्यात सत्ताबदल गोपीनाथजींनी केला - फडणवीस
    'त्यांच्या दिशेमुळे आमच्यासारखे कार्यकर्ते राजकारणात'
    मोदीजींनी कायम गरीबांसाठी काम केलं - फडणवीस
    '5 लाखांपर्यंतचा सर्व खर्च या कार्डद्वारे होणार आहे'
    'रुग्णाला औषध मिळेपर्यंत सर्व खर्च या कार्डमधून'
    आमच्या कामापेक्षा मोठी रेष वाढवा - देवेंद्र फडणवीस
    आम्ही सुरू केलेली कामं बंद करता - फडणवीस
    आमच्या कामाचं पुन्हा भूमिपूजन करता - फडणवीस
    आज मेट्रोचे सांगाडे दिसत आहेत - देवेंद्र फडणवीस
    'आमचं सरकार असतं तर तिथं मेट्रो धावली असती'

    16:20 (IST)

    परीक्षेआधी गोपनीयतेचा भंग - जितेंद्र आव्हाड
    'विद्यार्थ्यांवर अन्याय नको म्हणून परीक्षा रद्द'
    म्हाडा भरतीचा पेपर कुठेही फुटला नाही - आव्हाड
    पेपर फोडण्याआधीच आरोपींची धरपकड - आव्हाड
    तातडीनं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय - आव्हाड
    विद्यार्थ्यांचं परीक्षाशुल्क परत मिळणार - आव्हाड
    म्हाडा स्वत: प्रश्नपत्रिका तयार करेल - आव्हाड
    परीक्षेची जबाबदारी म्हाडाची असेल - जितेंद्र आव्हाड

    15:51 (IST)

    नवी मुंबईतील पामबीच मार्गावर अपघात
    भीषण अपघातात 5 जण गंभीर जखमी
    जखमींवर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू

    15:45 (IST)

    नागपुरात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण
    आफ्रिकेतून प्रवास करून नागपुरात परतला होता
    कोरोना टेस्ट केली असता आढळला होता पॉझिटिव्ह
    जिनोम सिक्वेन्सिंगसाठी अहवाल पाठवला होता
    'त्या' रुग्णाचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
    नागपूर मनपा आयुक्त बी.राधाकृष्णन यांची माहिती
    ओमायक्रॉन रुग्णाची प्रकृती स्थिर, रुग्णालयात उपचार
    रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य मात्र निगेटिव्ह

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स