LIVE NOW

LIVE : SRPF जवानांच्या बदलासाठी अट आता 15 वर्ष ऐवजी 12 वर्ष, राज्य सरकारचा निर्णय

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | May 12, 2021, 8:12 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 12, 2021
auto-refresh

Highlights

8:12 pm (IST)

'राज्यात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार'
'कॅबिनेटमध्ये लॉकडाऊन वाढवण्याकडे कल'
मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील - राजेश टोपे
लॉकडाऊनमुळे रुग्णवाढीचं प्रमाण घटलं - टोपे
राज्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला - राजेश टोपे
'18 ते 44 वयोगटाचं लसीकरण तूर्तास स्थगित'
लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण स्थगित - टोपे
'लस उपलब्ध होताच 18+ लसीकरण सुरू करणार'
'45 वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य'
दुसरा डोस पूर्ण करण्याला प्राधान्य - राजेश टोपे
'खरेदी केलेली लस 45+ लोकांना दिली जाणार'
लसींच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेणार - टोपे
पहिल्या डोसची लगेच अपेक्षा करू नये - राजेश टोपे
4-5 दिवसांनंतर पहिल्या डोसचा निर्णय - राजेश टोपे
'लस उपलब्ध झाल्यावर पत्रकारांसंदर्भात निर्णय'
'केंद्राच्या परवानगीनंतर लसींसाठी ग्लोबल टेंडर काढू'
यासंदर्भात मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार -टोपे
लोकल ट्रेनबाबतचे निर्बंध कायम राहतील - टोपे
लोकलबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेणार - टोपे
'येत्या 2 दिवसांत अंतिम नियमावली जाहीर होणार'
'राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचं उद्दिष्ट'
राज्यात म्युकर मायकोसिस वाढतोय - आरोग्यमंत्री

5:29 pm (IST)

मोझॅक पोर्ट्रेट च्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांना सलाम !


देशभरात  कोरोना महामारीच्याच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे.  देशांत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात मुंबईत आहे या संकटात देखील अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन काम करत आहेत. मग ते रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण बरे करणारे डॉक्टर्स , नर्स असो किंवा रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून अक्षरशः २४ -२४ तास बंदोबस्ताला उभे असणारे पोलिस असो किंवा या संकट काळातही समाजाला योग्य माहिती देणारे पत्रकार असो..! या साऱ्यांचेच कार्य उल्लेखनीय आहे. आणि म्हणूनच या रियल हिरोच्या कार्याला गौरवण्यासाठी विविध पोर्ट्रेट साकारून तब्बल १४ विश्वविक्रम करणारे कलाकार चेतन राऊत यांनी आणखी एक पोर्ट्रेट साकारले आहे.

 


5:09 pm (IST)

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायकांना मोठा दिलासा
दया नायक यांच्या बदलीला 'मॅट'कडून स्थगिती
दया नायक यांची गोंदियाला केली होती बदली
दया नायक आहे त्याच पदावर कायम - सूत्र
थोड्याच वेळात आदेशाची प्रत जारी करणार 

4:54 pm (IST)

माथेरान, पाचगणी -महाबळेश्वर येथील घोड्यांना पुण्या मुंबईतील प्राणी प्रेमींची मदत

लॉकडाऊन काळात पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने महाराष्ट्रातील माथेरान आणि पाचगणी महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी घोड्यांच्या खुराकाचा प्रश्न निर्माण झालाय.मात्र पुण्या मुंबईतील प्राणी प्रेमींनी घोड्यांच्या खुराकासाठी मदतनिधी उभा केलाय. जीवरक्षा वेलफेयर ट्रस्च्या मनोज ओसवाल यांनी माथेरान येथील शेकडो घोड्यांचना खुराक मिळवून दिला आता येत्या 19 ,20 मेला ओसवाल आणि सहकारी पाचगणी ,महाबळेश्वर येथील घोड्यांचना खुराक देणार आहेत.


4:50 pm (IST)

माथेरान, पाचगणी -महाबळेश्वर येथील घोड्यांना पुण्या मुंबईतील प्राणी प्रेमींची मदत

लॉकडाऊन काळात पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने महाराष्ट्रातील माथेरान आणि पाचगणी महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी घोड्यांच्या खुराकाचा प्रश्न निर्माण झालाय.मात्र पुण्या मुंबईतील प्राणी प्रेमींनी घोड्यांच्या खुराकासाठी मदतनिधी उभा केलाय. जीवरक्षा वेलफेयर ट्रस्च्या मनोज ओसवाल यांनी माथेरान येथील शेकडो घोड्यांचना खुराक मिळवून दिला आता येत्या 19 ,20 मेला ओसवाल आणि सहकारी पाचगणी ,महाबळेश्वर येथील घोड्यांचना खुराक देणार आहेत.


4:18 pm (IST)

गडचिरोली - माओवाद्यांचा पोलीस ठाण्यावर गोळीबार
जांबिया गट्टा पोलीस ठाण्यावर माओवाद्यांचा गोळीबार
सतर्क जवानांचं माओवाद्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर
घनदाट जंगल आणि अतिदुर्गम भागातील पोलीस ठाणे
जांबिया गट्टा पोलीस ठाण्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न 
माओवाद्यांचा प्रयत्न सतर्क जवानांनी हाणून पाडला

 

4:07 pm (IST)

लोकमत मीडियाकडून मोठी घोषणा
'कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत'
'लोकमत मीडिया देणार 10 लाखांची मदत'
कार्यकारी संचालक करण दर्डांची घोषणा 

1:51 pm (IST)

मराठा आरक्षणावरून सरकारचा निषेध
'सरकारनं आरक्षणाला पर्याय दिला नाही' 
याचिकाकर्ते विनोद पाटलांनी केला निषेध

12:49 pm (IST)

वर्धा जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध
13 ते 18 मेपर्यत निर्बंध वाढवले
दवाखाने, मेडिकल वगळता सर्व बंद
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं निर्णय
वर्धा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

12:03 pm (IST)

अमरावती - रेमडेसिवीरचा काळाबाजार
2 डॉक्टर, 4 रुग्णालयीन कर्मचारी अटकेत 
10 रेमडेसिवीरसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स