Maharashtra band today Live Updates: महाराष्ट्र बंदला उत्सफूर्त असा प्रतिसाद मिळाला: जयंत पाटील

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 11, 2021, 15:44 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:46 (IST)

  उद्धव ठाकरे - गडकरींकडून रस्ते प्रकल्पांचा आढावा
  'राज्यातील महामार्गांचे प्रकल्प वेगानं पूर्ण करणार'
  मंत्रालयातून नियमित आढावा घेणार - उद्धव ठाकरे
  'प्रलंबित रस्ते प्रकल्पांना कालबद्ध रीतीनं मार्गी लावा'
  मुख्यमंत्र्यांचे 'सह्याद्री'वरील बैठकीत सचिवांना निर्देश

  20:54 (IST)

  गडकरी - मुख्यमंत्र्यांत चर्चा झाली - विनायक राऊत
  15 दिवसांत पूर्णपणे काम सुरू होईल - विनायक राऊत
  'पनवेल-इंदापूर हा मार्ग नवीन कंत्राटदाराकडे देणार'

  20:54 (IST)

  'सह्याद्री'वरील अतिशय महत्वाची बैठक संपन्न
  उद्धव ठाकरे - नितीन गडकरींमध्ये झाली चर्चा
  राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांबाबत महत्वाची चर्चा
  सर्व महामार्गांबाबत सविस्तर चर्चा - अशोक चव्हाण
  भूसंपादनाबाबत बैठकीत चर्चा - अशोक चव्हाण
  'वनविभागानं तात्काळ मंजुरी द्यावी, सीएमचे आदेश'
  नवीन जीआरनुसार भूसंपादन - अशोक चव्हाण
  समृद्धी महामार्गाला पूरक जोड देणार - चव्हाण
  औरंगाबाद आणि पुणे जोडावा - अशोक चव्हाण
  हैदराबादला हा मार्ग जोडला जावा - अशोक चव्हाण
  'भूसंपादनाबाबत सेवानिवृत्त IAS अधिकारी नेमणार'
  'मुंबई-गोवा महामार्गाबाबत 15 दिवसांनी आढावा'
  'राष्ट्रीय महामार्गांवरील खड्ड्यांच्या निधीसाठी चर्चा'
  रेड्डी-रेवसबाबत चर्चा झाली, निर्णय नाही - चव्हाण
  'मुंबई-गोवा महामार्गाचं 10 टप्प्यांत काम करणार'
  10 पैकी 5 ठिकाणी काम गतीनं होत नाही - चव्हाण
  काही ठिकाणी कंत्राटदार टर्मिनेट करणार - चव्हाण
  गडकरी या सर्वांसाठी सकारात्मक - अशोक चव्हाण
   

  20:32 (IST)

  बेस्ट कर्मचाऱ्यांना उद्याच्या आंदोलन पार्श्वभूमीवर नोटीस
  ड्रायव्हर भाड्यानं देण्याच्या मुद्यांवर करणार आंदोलन
  'जादा ठरलेल्या कर्मचाऱ्यांना इतर आस्थापनांना भाड्यानं'
  बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी असं काढलंय परिपत्रक

  20:16 (IST)

  ठाणे - अवघ्या 4 दिवसांत सव्वासात हजार बाटल्या रक्तसंकलन, पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून राबवलेल्या महारक्तदान सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  19:33 (IST)

  भिवंडी - दापोडा इथं गोदामात गुन्हे शाखेचा छापा
  हुक्का फ्लेव्हरचा 9 कोटींचा साठा केला जप्त
  कारवाईमुळे हुक्का चालकांचे धाबे दणाणले
  याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  18:59 (IST)

  साई संस्थान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला नोटीस
  अधिकारी कान्हुराज बगाटेंना हायकोर्टाची नोटीस
  तदर्थ समिती, कोर्टाची परवानगी न घेता बिलं अदा
  परस्पर निधी खर्च केल्यानं हायकोर्टाची नोटीस
  सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी केली होती याचिका
  केवळ दैनंदिन खर्च करण्याची होती परवानगी

  18:31 (IST)

  अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
  महत्वपूर्ण बैठक सुमारे दीड तास चालली
  देशातील कोळशाच्या संकटावर झाली चर्चा
  प्रल्हाद जोशी, आर.के. सिन्हा होते उपस्थित
  ऊर्जा सचिव, कोळसा सचिव होते उपस्थित
  एनटीपीसीचे अधिकारीही होते उपस्थित
  कोळशाचा प्रश्न सोडवण्यासाठी निर्णय - सूत्र

  केंद्रीय कोळसा मंत्र्यांची ट्विटमध्ये माहिती
  '43 दशलक्ष टन कोळसा स्टॉकमध्ये उपलब्ध'
  वीज संकट येणार नाही - प्रल्हाद जोशी

  16:57 (IST)

  राज्यभरात दुपारनंतर दुकानं उघडायला सुरुवात
  मविआच्या 'महाराष्ट्र बंद'ला राज्यात संमिश्र प्रतिसाद

  16:55 (IST)

  नाशिकमधल्या अंबड पोलिसांची कामगिरी
  खुनाचा प्रयत्न उधळला, तडीपारासह चौघांना अटक
  गावठी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसं, कोयते जप्त

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स