Live Updates : नाशिक शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 11, 2022, 18:56 IST
  LAST UPDATED 7 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:8 (IST)

  राष्ट्रवादीतर्फे गृहमंत्री वळसे-पाटलांना पत्र
  'फडणवीसांकडून सभागृहाची दिशाभूल'
  वळसे-पाटलांकडे कार्यवाहीबाबत मागणी
  'फडणवीसांनी सादर केलेला व्हिडिओ जुना'
  राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाणांचं पत्र

  21:23 (IST)


  'फडणवीसांनी दिलेल्या पुराव्यासंदर्भात आक्रमक'
  भाजप लवकरच कोर्टात जाणार - चंद्रकांत पाटील
  'कोर्टात सीबीआय चौकशीची मागणी करणार'
  मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
  मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार - पाटील
  'अर्थसंकल्प म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल'
  एसटी कर्मचारी अडचणीत - चंद्रकांत पाटील

  21:18 (IST)

  चीन - चांगचून शहरात लॉकडाऊन
  चीनमध्ये कोरोनानंतर नवा विषाणू
  नव्या विषाणूच्या उद्रेकाची भीती

  20:26 (IST)

  मालेगाव : 
  मालेगावच्या गिगाव फाट्यावर पुन्हा भीषण अपघात, रिक्षा आणि ट्रकचा झाला भीषण अपघात, अपघातात 2 जण जागीच ठार तर 3 ते 4 जण जखमी, जखमींना शासकीय रुग्णालयात करण्यात आले दाखल, एका आठवडयातील हा चौथा अपघात

  19:47 (IST)

  उद्धव ठाकरे-शरद पवारांमधील बैठक संपली
  वर्षा बंगल्यावर सुरू होती महत्त्वाची बैठक
  उपमुख्यमंत्री अजित पवारही होते बैठकीला
  तब्बल दीड तासापासून सुरू होती खलबतं
  सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा
  शेतकरी पंपाच्या थकीत वीज बिलावर चर्चा?

  19:33 (IST)

  उद्धव ठाकरे - शरद पवारांमध्ये 'वर्षा'वर बैठक
  उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला उपस्थित
  सध्याच्या राजकीय स्थितीवरही चर्चा होणार
  शेतकरी पंपाच्या थकीत वीज बिलावर चर्चा?
  तब्बल तासाभरापासून 'वर्षा'वर खलबतं
  अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा - सूत्र
  काय असणार 'मविआ'ची रणनीती?

  19:29 (IST)

  बनावट मद्य बॉटल झाकण बनवणाऱ्या कंपन्या
  3 कंपन्यांवर ठाणे राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
  11 आरोपींसह एकूण 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
  आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

  19:17 (IST)

  ठाणे - बनावट पद्धतीचं मद्य बॉटल झाकण बनवणाऱ्या 3 कंपन्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 11 आरोपींसह एकूण 40 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

  19:7 (IST)

  रश्मी शुक्लांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा
  1 एप्रिलपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश

  19:3 (IST)

  फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट
  चंद्रकांत पाटील, शेलारही होते उपस्थित
  'मी एक निमंत्रण द्यायला आलो होतो'
  बाकी कोणती चर्चा नाही - देवेंद्र फडणवीस

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स