Live Updates : सोलापुरात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 11, 2022, 20:03 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:32 (IST)

  नवी मुंबईत दिवसभरात 1873 कोरोना रुग्ण
  नवी मुंबईत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

  21:25 (IST)

  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मराठा आरक्षणावरील उद्याची सुनावणी पुढे ढकलली, विनोद पाटलांच्या रिव्ह्यू पिटिशनवर होणार होती सुनावणी

  20:48 (IST)

  दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरी कसोटी
  भारताचा पहिला डाव 223 धावांवर आटोपला
  विराट कोहलीची 79 धावांची एकाकी झुंज
  दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांचा प्रभावी मारा
  मार्को जानसेन 3, कागिसो रबाडाला 4 विकेट्स

  20:12 (IST)

  औरंगाबाद - वकिलाला रो हाऊस विकण्यास नकार, उच्चभ्रू वस्तीतला संतापजनक प्रकार, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल, एकाला अटक

  19:29 (IST)

  मुंबईत 14,980 रुग्ण बरे, 2 रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत दिवसभरात 11 हजार 647 नवे रुग्ण
  मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत घट

  19:27 (IST)

  गोवा निवडणुकीत मविआ पॅटर्न करून दाखवा, जनता त्यांना धडा शिकवेल, संजय कुटेंचा टोला

  19:27 (IST)

  विधिमंडळात न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही मात्र सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा - संजय कुटे

  18:51 (IST)

  पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 3459 नवीन रुग्ण
  पुण्यात दिवसभरात 1104 रुग्ण कोरोनामुक्त
  पुणे शहरात कोरोनाच्या एका रुग्णाचा मृत्यू

  18:2 (IST)

  अनिल देशमुखांच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी, अनिल देशमुखांच्या वकिलांनी केला युक्तिवाद, सरकारी पक्षाकडून महाधिवक्ता अनिल सिंग मांडणार बाजू, देशमुखांच्या जामिनाला सरकारी पक्षाचा विरोध

  17:11 (IST)

  गोव्यात आमचे आघाडीचे प्रयत्न सुरू - संजय राऊत
  मनाप्रमाणे काही न घडल्यास स्वबळावर लढू - राऊत
  काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे - राऊत
  एकत्र लढलो तर गोव्यात परिवर्तन घडवू शकतो - राऊत
  गोव्यात महाविकास आघाडी असावी - संजय राऊत
  शिवसेना उत्तर प्रदेशात 50 जागा लढेल - संजय राऊत
  गोवा आणि यूपीत परिवर्तन निश्चित आहे - संजय राऊत

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स