Live Updates: कुठं गेली वक्फ बोर्डाची हजारो कोटींची जमीन? जलील यांचा सवाल

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 11, 2021, 20:57 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:3 (IST)

  एमआयएमची तिरंगा रॅली औरंगाबादहून मुंबईत
  इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली
  जलील आणि ओवेसींची चांदिवलीत सभा सुरू
  एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित
  मी मुंबईत येऊ नये यासाठी मोठे प्रयत्न - जलील
  अखेर मी मुंबईत आलोच - इम्तियाज जलील
  'पोलिसांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला'
  अनेक अडथळे पार करून मुंबईत आलो - जलील
  पोलिसांवर कुणाचा दबाव होता? - इम्तियाज जलील
  'मुस्लिम आरक्षणासाठी इमानदारीनं प्रयत्न करणार'
  मराठ्यांप्रमाणे मुस्लिमांनी मैदानात उतरावं - जलील
  संसदेत आपली बाजू ठामपणे मांडणार - जलील
  'फक्त निवडणुकांवेळी जनतेची आठवण येते का?'
  'अन्याय होत असल्यास आम्ही गप्प बसायचं का?'
  ही फक्त सुरुवात आहे, खरी लढाई बाकी - जलील
  राज्यकर्ते आम्हाला घाबरले - इम्तियाज जलील
  वक्फ बोर्डाची जमीन कुणी लाटली? - जलील
  9 जणांवर आता गुन्हे दाखल केले - जलील
  'पैशांच्या जोरावर आमच्या जमिनी हडपल्या'
  आम्हाला आमच्या जमिनी परत द्या - जलील
  ...अन्यथा रस्त्यावर उतरणार - इम्तियाज जलील 

  19:3 (IST)

  एमआयएमची तिरंगा रॅली औरंगाबादहून मुंबईत
  इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली
  चांदिवलीत सभा घेण्यावर इम्तियाज जलील ठाम
  रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा बंदोबस्त
  चांदिवलीमध्ये सभास्थळी जोरदार घोषणाबाजी
  एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित
  थोड्याच वेळात इम्तियाज जलील सभास्थळी येणार
  एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीही दाखल होणार
  पोलिसांनी बंदी घातली असतानाही सभेला गर्दी  

  17:40 (IST)

  भिवंडीतील मुंबई महापालिकेची पाईपलाईन फुटली
  वळ ग्रामपंचायत हद्दीतील व्हॉल्व्ह अचानक फुटला
  पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया
  पाईपलाईन फुटल्यानं 50 ते 60 फूट उंच पाण्याचे फवारे 

  17:0 (IST)

  चंद्रपूर - भद्रावतीचे तहसीलदार डॉ.निलेश खटकेंना अटक
  डॉ.निलेश खटकेंना 25 हजार रुपयांची लाच घेताना अटक
  नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
  लाल मातीच्या उत्खननाची परवानगीसाठी मागितली लाच
  खटकेंना अटक झाल्यानं महसूल विभागात प्रचंड खळबळ 

  16:50 (IST)

  मुंबई विमानतळावर 35 किलो हेरॉईन जप्त
  एअर इंटेलिजन्स युनिटची मोठी कारवाई
  ट्रॉली बॅगच्या पोकळ्यांमध्ये भरलेलं हेरॉईन
  जप्त हेरॉईनचं बाजारमूल्य 240 कोटी रुपये
  झिम्बाब्वेच्या 2 तस्करांना केली अटक 

  15:42 (IST)

  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना धमकी प्रकरण
  जीवे मारण्याच्या धमकीची गंभीर दखल - गृहमंत्री
  'मुंबईच्या महापौरांसह कुटुंबीयांना पोलीस संरक्षण'
  'धमकीचं पत्र पाठवणाऱ्याचा तातडीनं शोध घेणार'
  कठोर शासन करण्याचे दिलीप वळसे पाटलांचे आदेश

  15:35 (IST)

  एसटी आणि डाॅक्टरानंतर आता मेडिकल चालक बेमुदत बंदच्या तयारीत

  14:30 (IST)

  अहमदनगरमधील बनावट बायोडिझेल प्रकरण
  9 आरोपींना मिळाला आहे अटकपूर्व जामीन
  आरोपींविरोधात पोलीस औरंगाबाद हायकोर्टात
  अटकपूर्व जामीन रद्द करण्याची पोलिसांची मागणी

  14:28 (IST)

  'नेमकचि बोलणे' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
  शरद पवारांच्या भाषणांवरील पुस्तकाचं प्रकाशन
  शरद पवार सतत विचार देत असतात - संजय राऊत
  'देशाला, राज्याला दिशा देण्याचं काम पवारांनी केलं'
  'मी शरद पवारांना बसायला खुर्ची का दिली...'
  '...हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे'
  'नेमकचि बोलणे'मध्ये 61 विविध विषयांवरील भाषणं'
  पुस्तकाची प्रत पंतप्रधानांना देणार - संजय राऊत
  सध्या देशात विकृत राजकारण सुरू - संजय राऊत
  भाजपला देश एकसंघ नको आहे - संजय राऊत
  विचार मांडायचाच नाही ही झुंडशाही - संजय राऊत
  'आमच्याकडे दारूगोळा खूप, वेळ आली की फोडू' 

  13:26 (IST)

  आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी पुन्हा आक्रमक
  17 डिसेंबरला रस्त्यावर उतरून चक्का जाम करणार
  ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या माध्यमातून आंदोलन
  अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा सरकारला इशारा
  राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं आक्रमक 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स