LIVE : मुख्यमंत्री ठाकरेंसह शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 11, 2021, 17:41 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:2 (IST)

  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं कमी
  राज्यात दिवसभरात 40,956 नव्या रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 71 हजार 966 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 793 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 87.67, मृत्युदर 1.49%
  राज्यात सध्या 5 लाख 58,900 ॲक्टिव्ह रुग्ण


  मुंबईत दिवसभरात 1717 नवीन रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 6080 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 51 रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत 41,102 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण 

  19:51 (IST)

  देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार 
  'श्रेय घेणारे म्हणतात कायदा फुलप्रूफ नाही'
  किती हा दुटप्पीपणा - देवेंद्र फडणवीस
  भाजप सरकारच्या काळात कायदा वैध - फडणवीस
  'सर्वोच्च न्यायालयही स्थगिती देण्यास नकार देतं'
  'नव्या सरकारच्या काळात स्थगिती, कायदाही अवैध'
  मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? - फडणवीस 

  19:50 (IST)

  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं कमी
  राज्यात दिवसभरात 40,956 नव्या रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 71 हजार 966 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 793 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 87.67, मृत्युदर 1.49%
  राज्यात सध्या 5 लाख 58,900 ॲक्टिव्ह रुग्ण 

  18:2 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट
  मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यपालांची भेट
  'मराठा आरक्षणाच्या संदर्भात राष्ट्रपतींना पत्र'
  'राष्ट्रपतींना पत्र देण्यासाठी राज्यपालांची भेट'
  पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिणार - मुख्यमंत्री
  लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार - मुख्यमंत्री
  'मराठा आरक्षणाची लढाई सरकारविरोधात नाही'
  'आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे'
  'केंद्र सरकारनं मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा'
  मराठा समाजाला न्याय मिळावा - मुख्यमंत्री
  'मराठा समाजानं नेहमीच समजूतदारपणा दाखवला'
  राज्य सरकार मराठा समाजासोबत - मुख्यमंत्री
  मराठा समाजाला हक्क मिळवून देणारच - मुख्यमंत्री
  मराठा आरक्षण कायदा फुलप्रूफ नव्हता - मुख्यमंत्री
  'जर कायदा फुलप्रूफ असता तर टिकला असता'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार 

  17:10 (IST)

  दक्षिण अरबी समुद्रात 14 ते 15 मेच्या आसपास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीच्या भागांना भारतीय हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा 

  16:33 (IST)

  दंडकारण्यात कोरोना आणि अन्नातून विषबाधा
  10 माओवाद्यांचा मृत्यू, दंतेवाडा पोलिसांचा दावा
  बस्तरसह दंडकारण्यात शेकडो माओवाद्यांना कोरोना
  माओवाद्यांचे अनेक मोठे नेते गंभीर आजारी
  अतिदुर्गम भागात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता

  16:33 (IST)

  गोव्याचे मुख्यमंत्री थेट कोरोना वॉर्डात
  पीपीई किट घालून कोरोना वॉर्डात पाहणी 
  डॉ.प्रमोद सावंतांनी केली रुग्णांची विचारपूस
  गोवा मेडिकल कॉलेजमधील वॉर्डला दिली भेट

  16:33 (IST)

  गोवा-मडगावमध्ये ऑक्सिजन टँकरला गळती
  टँकरमध्ये ऑक्सिजन भरत असताना गळती
  अग्निशमन दल, गोवा पोलीस घटनास्थळी
  गळती थांबविण्यात अग्निशमन दलाला यश
  प्लांटमधून टँकरमध्ये भरत होते ऑक्सिजन

  16:31 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार राज्यपालांची भेट
  मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यपालांना भेटणार
  उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाणही भेटणार
  एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार
  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचं पत्र
  मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती कोविंद यांना लिहिलंय पत्र
  'ते' पत्र मुख्यमंत्री राज्यपालांकडे सुपूर्द करणार
  बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेण्याची शक्यता 

  13:40 (IST)

  RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
  आरोपी श्रीनिवास रेड्डींना तात्पुरता जामीन
  रेड्डी निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक
  हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून जामीन 
  नागपूर बाहेर न जाण्याचे न्यायालयाचे आदेश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स