केंद्र सरकारचा मका, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य शासनाला मका-ज्वारी खरेदी करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, मुदत संपल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे मका आणि ज्वारी होती पडून, भाजप खासदार डॉ.भारती पवारांनी मुदतवाढीसाठी केला होता पाठपुरावा
21:57 (IST)
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांच्या कारला अपघात
अपघातात पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू
उपचारादरम्यान रुग्णालयात झाला मृत्यू
अपघातात श्रीपाद नाईकही जखमी
कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील घटना
20:45 (IST)
उर्मिला मातोंडकरनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंची घेतली भेट
मुख्यमंत्री माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख -उर्मिला
अनौपचारिक भेट असल्याची प्रतिक्रिया
20:11 (IST)
मराठा आरक्षणात केंद्राची भूमिका महत्वपूर्ण, वरिष्ठ विधीज्ञांचं मत
19:51 (IST)
पुण्यातील खासगी कोचिंग क्लासेस सुरू होणार
प्रशिक्षण संस्थाही अखेर पुन्हा सुरू होणार
कोरोनामुळे 18 मार्चपासून क्लासेस होते बंद
9 वीपासून पुढच्या क्लासेसना परवानगी
कोरोनाचे नियम पाळणं मात्र बंधनकारक
पुणे महापालिका आयुक्तांचे नवे आदेश
कोचिंग व्यावसायिक, शिक्षकांमध्ये उत्साह
19:38 (IST)
बर्ड फ्लूबाबत अफवा पसरवू नका -मुख्यमंत्री
'प्रशासनानं नागरिकांना योग्य माहिती द्यावी'
'माणसांमध्ये या रोगाचं संक्रमण होत नाही'
त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही -उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील स्थितीचा आढावा
जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे पार पडली बैठक
18:54 (IST)
'मराठा आरक्षण टिकण्यासाठी सर्व प्रयत्न'
आरक्षणप्रकरणी अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
'केंद्रानंही जबाबदारी ओळखून मदत करावी'
'मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सहकार्य करावं'
18:52 (IST)
मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची राजधानी दिल्लीत झाली बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार, सोबतच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही उद्धव ठाकरे पत्र लिहिणार -एकनाथ शिंदे
18:40 (IST)
शिर्डीत साई दर्शनासाठी होतेय मोठी गर्दी
ऑनलाईन पास घेणं बंधनकारक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानचा निर्णय
18:28 (IST)
मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक
'बर्ड फ्लू'संदर्भात 'वर्षा'वर बैठक सुरू
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार उपस्थित
विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित
बैठकीनंतर मंत्री केदार व्हीसीद्वारे संवाद साधणार
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स