LIVE Updates: मुंबई डबेवाल्यांचा Maharashtra Bandh ला पाठिंबा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 10, 2021, 22:34 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  7:34 (IST)

  महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नाशिकच्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद
  मनमाड, मालेगाव,येवला,चांदवड यासह नाशिकच्या ग्रामीण भागात बंद
  सर्व दुकाने कडकडीत बंद
  बंदमध्ये लासलगाव सोबत सर्वच बाजार समित्या सहभागी
  बाजार समितींच्या आवारात पसरला शुकशुकाट

  7:20 (IST)

  'मुंबई डबेवाला असोसिएशन' चा महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा
  पण काम बंद करणार नाही- मुंबई डबेवाला असोसिएशन

  22:9 (IST)

  कुंभार्ली घाटातील दरड हटवण्यात प्रशासनाला यश
  पावसामुळे घाटातली वाहतूक संथगतीनं सुरू

  22:5 (IST)

  व्यापारी असोसिएशनचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा
  मुंबईतील दुकानं दुपारी 4 पर्यंत बंद ठेवणार

  22:1 (IST)

  'मविआ'च्या महाराष्ट्र बंदला बेस्टसह एसटीचा पाठिंबा
  बेस्ट बंद ठेवण्याचं बेस्ट कामगार संघटनेचं आवाहन
  बेस्ट वर्कर्स युनियनचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही

  21:55 (IST)

  किसान सभेचा महाराष्ट्र बंदला सक्रिय पाठिंबा

  21:54 (IST)

  महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ
  SRPF च्या 3 तुकड्या, 500 होमगार्ड तैनात
  700 स्थानिक शस्त्रधारी असं अतिरिक्त मनुष्यबळ

  21:32 (IST)

  रत्नागिरी - चिपळूणमध्ये पावसाचं धुमशान
  विजांच्या कडकडाटासह घाटमाथ्यावर मुसळधार
  शिरगाव, फोफळी गावातून जाणाऱ्या नदीला पूर
  कुंभार्ली घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक बंद
  घाटातील दरड बाजूला हटवण्याचे शर्थीचे प्रयत्न

  19:43 (IST)

  चंद्रपूर - महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्र.3, 5 ठप्प
  कोळसा पुरवठा रखडल्यानं वीज केंद्र प्रशासनाचा निर्णय
  अपुऱ्या कोळसा पुरवठ्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम
  सध्या 2930 स्थापित क्षमता, 1200 मे.वॅ. वीजनिर्मिती
  ऐन दिवाळीत वीजसंकट गहिरं होण्याची शक्यता

  19:5 (IST)

  'मविआ'कडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक
  यूपीतील लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ बंद
  शांततेत महाराष्ट्र बंद पाळण्याचं आवाहन
  शिवसेना महाराष्ट्र बंदमध्ये ताकदीनं उतरणार
  उद्या अत्यावश्यक सेवा वगळून बंद पाळणार
  उद्याच्या 'महाराष्ट्र बंद'ला भाजपकडून तीव्र विरोध
  राज्यातील काही व्यापारी संघटनांचा बंदला विरोध
  एपीएमसीच्या पाचही बाजारपेठा उद्या बंद राहणार
  भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणामाची शक्यता

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स