Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपचारासाठी रुग्णालयात दाखल

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 10, 2021, 20:02 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:4 (IST)

  कोल्हापूर - खासगी ट्रॅव्हलच्या बसची काच फोडली
  ड्रायव्हरला मारहाण केल्याचा संपकऱ्यांवर आरोप
  वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बसवरही दगडफेक
  बोरीपारधी इथं स.11 वा. दगडफेक केल्याचा प्रकार

  20:15 (IST)

  एसटी संपासंदर्भात 'सह्याद्री'वर बैठक संपन्न
  संयुक्त कृती समिती-अनिल परबांमध्ये झाली बैठक
  राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार
  बैठकीत एसटी संपावर कोणताही तोडगा नाही
  एसटी कर्मचारी संपाबाबत उद्या पुन्हा बैठक
  'विलीनीकरण मागणी 1-2 दिवसात पूर्ण होणार नाही'
  समिती यासंदर्भात निर्णय घेईल - अनिल परब
  उर्वरित मागण्यांचं लेखी आश्वासन दिलंय - अनिल परब
  संप सुरू राहिल्यास कामगारांचं नुकसान - अनिल परब
  'सरकारला कामगारांचं नुकसान करण्याची इच्छा नाही'
  'दिवाळीत वेठीस धरल्यानं संपकऱ्यांवर कारवाई'
  'लोकांची गैरसोय होणार नाही ही आमची जबाबदारी'
  हा संप कोर्टानंही बेकायदेशीर ठरवलाय - परब
  चर्चेची दारं सातत्यानं खुली - परिवहनमंत्री परब
  एसटी संप मागे घेण्याचं परिवहन मंत्र्यांचं आवाहन

  20:6 (IST)

  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच
  बैठकीत एसटी संपावर तोडगा नाही - सदाभाऊ खोत
  राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाची मागणी - खोत
  'आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी द्या'
  'निलंबनाची कारवाई होऊ नये म्हणून मागणी केली'
  'राज्य सरकारनं कारवाई मागे घेण्याचा विचार करावा'
  'कामगारांच्या वतीनं विरोधी पक्षनेते सरकारशी बोलणार'
  अन्याय होत ‌‌असेल तर आम्ही बोलणार - सदाभाऊ खोत
  पोलिसांनी आंदोलकांना दाबण्याचा प्रयत्न केला - खोत
  हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी पुकारलं आहे - सदाभाऊ खोत
  कोणताही राजकीय पक्ष यात सहभागी नाही - खोत
  'कोर्टाकडे बोट दाखवलं की प्रश्न संपतो असं नाही'

  17:56 (IST)

  शिर्डी विमानतळ महत्वाचं विमानतळ घोषित
  केंद्र सरकारनं जारी केलं नोटिफिकेशन
  शिर्डीतून दररोज अनेक विमानांची ये-जा सुरू
  अल्पावधीत मोठ्या प्रमाणात विमान वाहतूक
  शिर्डी विमानसेवेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  अधिनियमानुसार केंद्रानं जारी केलं नोटिफिकेशन
  देशातील महत्वाच्या विमानतळांमध्ये शिर्डीची गणती 

  17:34 (IST)

  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मलिकांचं कौतुक
  नवाब मलिकांच्या लढ्याला दिला पाठिंबा
  मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा लढ्याला पाठिंबा
  मुख्यमंत्र्यांकडून 'गुड गोईंग' असं म्हणत स्तुती
  'मलिकांनी घेतलेली भूमिका पुढे सुरू ठेवावी'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नवाब मलिकांना सूचना

  17:9 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठ, मानदुखीचा त्रास
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर होणार छोटी शस्त्रक्रिया
  मुख्यमंत्री एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल
  'दोन-तीन दिवस रुग्णालयात राहून उपचार घेणार'
  आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी - उद्धव ठाकरे
  'लवकरच माझी तब्येत बरी होईल अशी खात्री'

  16:54 (IST)

  मुंबई मनपातील सदस्यसंख्या वाढवली - एकनाथ शिंदे
  'मुंबई महापालिकेत वाढत्या लोकसंख्येनुसार निर्णय'
  नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देता येतील - शिंदे
  227 वरून 236 वॉर्डरचना करणार - एकनाथ शिंदे
  अध्यादेश काढल्यानंतर वॉर्ड फेररचना होईल - शिंदे

  16:30 (IST)

  पूजा ददलानीला पुन्हा बजावणार समन्स
  मुंबई पोलीस चौकशीसाठी पाठवणार समन्स
  आर्यन खान खंडणी तक्रारप्रकरणी देणार समन्स

  16:27 (IST)

  शिवसेना कष्टकऱ्यांचं नेतृत्व करतं - संजय राऊत
  'भाजप नेते एसटी कर्मचाऱ्यांना भडकवतायत'
  शिवसेना खासदार संजय राऊतांचा आरोप
  'कामगारांच्या लढ्यातून महाराष्ट्र उभा राहिला'
  'भाजपच्या काळातही कामगारांच्या याच मागण्या'
  'महाराष्ट्राला राजकीय चिखलफेकीचा डाग लागतोय'
  कोणीही एकमेकांकडे बोट दाखवू नये - संजय राऊत
  आरोपांची चिखलफेक थांबली पाहिजे - संजय राऊत

  16:6 (IST)

  नवाब मलिकांविरोधात भाजपचं निषेध आंदोलन
  मंत्रालय परिसरात भाजप कार्यकर्ते आक्रमक
  मलिकांविरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स