LIVE: बीड भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरूच

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | July 11, 2021, 00:00 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    21:18 (IST)

    राज्यात दिवसभरात 8,296 रुग्णांची नोंद
    राज्यात दिवसभरात 6,026 कोरोनामुक्त
    राज्यात दिवसभरात 179 रुग्णांचा मृत्यू
    रिकव्हरी रेट 96.05 तर मृत्युदर 2.4 टक्के
    राज्यात 1 लाख 14,000 अॅक्टिव्ह रुग्ण 

    21:7 (IST)

    देशात लसीकरणाचा पुन्हा एकदा नवा उच्चांक 
    एकाच दिवशी 34 लाखांहून अधिकांचं लसीकरण
    आतापर्यंत 37 कोटी 57 लाखांहून अधिकांना लस

    20:13 (IST)

    आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मांडलं प्रखर मत
    'निर्बंध कडक करा किंवा पूर्ण सूट द्या'
    राजेश टोपेंचा मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव
    मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील - आरोग्यमंत्री
    'राज्यात लसीचा तुटवडा, हे सत्य आहे'
    'अधिकच्या लसींसाठी केंद्राकडे मागणी'
    केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार - टोपे 

    19:19 (IST)

    बीड जिल्ह्यात 30 भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
    प्रीतम मुंडेंना मंत्रिपदापासून डावलल्यानं राजीनामासत्र
    बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडेंच्या समर्थकांचे राजीनामे
    11 तालुकाध्यक्ष, जि.प.सदस्य, पं.स.सदस्यांचा समावेश 

    19:18 (IST)

    रत्नागिरी - पंदेरी धरणफुटीचा धोका टळला
    मंडणगडमधील पंदेरी धरणाची गळती बंद
    पंदेरी धरणाची गळती रोखण्याचं काम पूर्ण
    मुख्य अभियंता संतोष तिरमवार यांची माहिती
    स्थलांतरित नागरिकांना पुन्हा घरी पाठवलं
    गावातील दुकानं सुरू करण्यास परवानगी 
    गावातील पोलीस बंदोबस्तही हटवला 

    19:18 (IST)

    नागपूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची टीका
    'मविआमध्ये एकमत नसल्यानं निवडणूक लांबणीवर'
    'भास्कर जाधवांना विधानसभा अध्यक्षपदासाठी शुभेच्छा'
    'पदावर गेल्यावर मात्र निष्पक्षपणे काम करावं अशी अपेक्षा'
    नाराजी नसल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय - फडणवीस
    मुंडे भगिनी नाराज असल्याची फक्त अफवा - फडणवीस
    आता काही जणांची पतंगबाजी सुरू - देवेंद्र फडणवीस
    MPSC बाबत राज्य सरकार गंभीर नाही - फडणवीस
    'स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना सरकारची मदत नाही'
    'राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांना आवडलं नसेल'
    ...म्हणून कॉंग्रेसची बैलगाडी तुटली - देवेंद्र फडणवीस
    अमित शाह आधीपासून सहकार चळवळीत - फडणवीस
    'अमित शाह नव्या सहकार खात्याला योग्य न्याय देतील'
    'चांगलं काम केलेल्यांकडून नव्या सहकार खात्याचं स्वागतच'
    'ज्यांनी सहकार बुडवला त्यांनाच नव्या खात्यासंदर्भात भीती'
    फक्त 18 टक्केच पीक कर्ज वाटप झालंय - फडणवीस
    'सीएमनी बैठक घेऊन बँकांना कर्जवाटपचे निर्देश द्यावे'
    'विदर्भ, मराठवाड्यातील बँकांना मदतीचा निर्णय घ्यावा'
    नारपार प्रकल्पात नवीन काही नाही - देवेंद्र फडणवीस
    'तो निर्णय आमच्याच काळात, जीआरही निघाला होता'
    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट

    मुंबईत इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचं आंदोलन
    कॉंग्रेसच्या आंदोलनावर प्रवीण दरेकरांची टीका
    'आंदोलनाचं कसं हसू झालं हे महाराष्ट्रानं पाहिलं'
    'घोषणा देत असल्याचं बैलांनाही सहन झालं नाही'
    घोषणा देताना भाई जगताप पडले - प्रवीण दरेकर
    'बैलगाडीत चढताना महिलांचाही विचार केला नाही'
    'विस्कळीत, अनियोजन पद्धतीनं कॉंग्रेसचं आंदोलन'
    'कॉंग्रेसच्या आंदोलनात कोरोनाचे नियम धाब्यावर'
    सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा - प्रवीण दरेकर

    13:42 (IST)

    सातारा - जिल्हा बँकेला ईडीची नोटीस
    बँकेकडून 'जरंडेश्वर'ला 80 कोटींचं कर्ज
    सातारा जिल्हा बँकेची ईडीकडून होणार चौकशी

    12:26 (IST)

    सातारा - महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी
    पर्यटन बंद असतानाही वेण्णा लेक पॉईंट सुरू
    व्यावसायिक, पर्यटकांकडून नियमांची पायमल्ली
    वेण्णा लेकवर पोलीस येताच पर्यटक गायब

    11:26 (IST)

    मुंबई - दादरमध्ये भाजपचं आंदोलन
    12 आमदारांच्या निलंबनावरून आक्रमक
    मंगल प्रभात लोढा, कोळंबकरही सहभागी

    11:25 (IST)

    स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरण
    सुप्रिया सुळे लोणकर कुटुंबीयांच्या भेटीला
    केडगावात लोणकर कुटुंबाचं केलं सांत्वन

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स