Live Updates: मराठा आरक्षण आंदोलनात मृतांच्या वारसांना नोकरी देण्याचा प्रयत्न करू -राजेश टोपे

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 10, 2021, 23:53 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:56 (IST)
  नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांचा दणका, मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या, 5 वर्षांहून अधिक काळ मलईदार खात्यात चिटकून बसणाऱ्यांवर गदा; 2 अधिकारी, 24 अधीक्षक, 10 वरिष्ठ लिपिक, 99 करार कर्मचारी अशा एकूण 144 जणांच्या बदल्या
  20:16 (IST)

  राज्यात आणखी एका मोठ्या अधिकाऱ्यावर गुन्हा
  ADG दर्जाच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
  IPS अधिकारी देवेन भारतींविरोधात गुन्हा दाखल
  मालवणी पोलीस स्टेशनमध्ये केला गुन्हा दाखल
  कारवाई करू दिली नाही म्हणून केला गुन्हा दाखल
  IPS अधिकारी देवेन भारतींविरोधात गुन्हा दाखल
  पोलीस निरीक्षक दीपक कुरुळकरांनी केला गुन्हा दाखल

  19:54 (IST)

  आर्यन खाननं ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुन्हा मुंबई हायकोर्टात केली याचिका दाखल, न्यायमूर्ती नितीन सांबरेंनी दिलेल्या जामीन अटींमध्ये बदल करावा यासंदर्भात ही याचिका

  19:26 (IST)

  मुंबई मनपा क्षेत्रात 3 रुग्णांना संसर्ग झाल्याचं निदान
  मुंबईत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले एकूण 5 रुग्ण
  ओमायक्रॉनच्या रुग्णांना गंभीर लक्षणं नाहीत
  संबंधित रुग्ण मनपा रुग्णालयाच्या विलगीकरणात

  19:14 (IST)

  पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 4 नवे ओमायक्रॉनचे रुग्ण, पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली

  19:13 (IST)

  '28 डिसेंबर काँग्रेसचा स्थापना दिवस ऐतिहासिक करू'
  राहुल गांधी मुंबईत उपस्थित राहणार - भाई जगताप
  मुंबई पालिका निवडणुका मुख्य अजेंडा - भाई जगताप

  18:36 (IST)

  साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरण
  मंत्री प्राजक्त तनपुरेंची पुन्हा होणार चौकशी
  प्राजक्त तनपुरेंची ईडी करणार पुन्हा चौकशी
  महत्वाच्या कागदपत्रांबाबत होणार चौकशी

  18:7 (IST)

  लसीकरणासाठी भिवंडी मनपाची धडक मोहीम
  'त्या' आस्थापनांवर भिवंडी मनपाची कारवाई
  कामगारांनी लसीचे डोस न घेतल्यानं कारवाई
  दुकानं, हॉटेल, बेकरी भिवंडी मनपाकडून सील
  पालिकेकडून आस्थापनांकडून दंडात्मक कारवाई

  17:32 (IST)

  अण्णाभाऊ साठेंची उत्तुंग प्रतिभा समजली - भागवत
  'ते प्रत्यक्ष काय होते, सामाजिक कामाचाही परिचय'
  एमजीडी, विवेक साप्ताहिकाचा आभारी - मोहन भागवत
  'अवघ्या 49 वर्षं वयात त्यांनी एवढं अचाट काम केलं'
  अण्णाभाऊ साठे हे कायम प्रामाणिकतेनं जगले - भागवत
  किशोरवयापासून समाजासाठी उभे राहिले - मोहन भागवत
  अण्णाभाऊ साठे हे धार्मिक व्यक्तिमत्व होतं - भागवत
  सत्यावर ठाम राहिले, न्यायासाठी लढले - मोहन भागवत

  17:1 (IST)

  मनमाड - चांदवडच्या कातरणी येथील ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात, शेतकऱ्याकडून 900 रुपयांची लाच घेताना नाशिक एसीबीकडून रंगेहाथ अटक

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स