LIVE : नेपाळच्या पंतप्रधानांचा विश्वास दर्शक ठरावात पराभव; 124 खासदारांनी ओलींना नाकारलं

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 10, 2021, 18:33 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:28 (IST)

  मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी
  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या राज्यपालांना भेटणार
  अशोक चव्हाणांसह इतर सदस्य राज्यपालांना भेटणार
  संध्याकाळी 5 वा. राज्यपालांना भेटून निवेदन देणार 

  20:13 (IST)

  केंद्रीय आरोग्य विभागाची मुख्य सचिवांसोबत बैठक
  बैठकीत राज्यातील कोरोना स्थितीचा घेणार आढावा
  मुख्य सचिवांशी पुढील नियोजनावरही होणार चर्चा
  उद्या संध्याकाळी 5 वाजता होणार महत्वाची बैठक 

  19:56 (IST)

  'अडचणीतील लोककलावंतांना अर्थसहाय्य मिळणार'
  'अर्थसहाय्य देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक'
  'लोककलावंतांना मदत देण्यासाठी लवकरच प्रस्ताव'
  सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखांची माहिती 

  19:44 (IST)

  मुंबईसाठी अत्यंत दिलासादायक बातमी
  मुंबईत दिवसभरात 3580 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 1794 नवीन रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 74 रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत 45,534 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण 

  19:41 (IST)

  राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट
  राज्यातील रुग्णसंख्या 40 हजारांच्या खाली
  राज्यात दिवसभरात 37,326 नव्या रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 61 हजार 607 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 549 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 86.97, मृत्युदर 1.49%
  राज्यात सध्या 5 लाख 90,818 ॲक्टिव्ह रुग्ण 

  19:38 (IST)

  लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढण्याचे संकेत
  कॅबिनेट बैठकीत होणार निर्णय
  अनेक जिल्ह्यांत अजूनही परिस्थिती 'जैसे थे'
  लॉकडाऊन वाढवण्याची होत आहे मागणी
  राज्यात सध्या 15 मे पर्यंत आहे लॉकडाऊन 

  19:30 (IST)

  महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय
  '30 जून 2021 पर्यंत कोणत्याही बदल्या होणार नाही'
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय अध्यादेश जाहीर
  'मात्र अपवादात्मक परिस्थितीत बदल्या होऊ शकतात'
  'सेवानिवृत्तीमुळे आणि अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदं'
  'गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यास बदल्या होतील' 

  19:30 (IST)

  राज्यात म्युकर मायकोसिसचा वाढता धोका
  'म्युकर मायकोसिसवर वेळीच उपचार झाले पाहिजे'
  हा उपचार महागडा असल्यानं कॅपिंग करावं - टोपे
  'म.फुले जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश करावा'
  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश 

  19:30 (IST)

  'न्यूज18 लोकमत'च्या वृत्तमालिकेचा मोठा इम्पॅक्ट
  प्रत्येक कोविड रुग्णालयात बिल तपासणार - टोपे
  शासकीय कर्मचारी बिल तपासणार - राजेश टोपे
  रुग्णांची लूट थांबवणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे 

  19:30 (IST)

  मुंबई महापालिका ग्लोबल टेंडर काढणार - महापौर
  येत्या 2 दिवसांत ग्लोबल टेंडर काढणार - महापौर
  'ग्लोबल टेंडरमार्फत 50 लाख लसी खरेदी करणार'
  मुंबईकरांना मोफत लस देणार - किशोरी पेडणेकर 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स