LIVE NOW

LIVE: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | June 10, 2021, 10:41 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated 6 days ago
auto-refresh

Highlights

8:59 pm (IST)

मालाड दुर्घटनेप्रसंगी बीएमसी, महसूल, पोलीस व संबंधित तत्कालीन अधिकाऱ्यांना निलंबित करून फौजदारी गुन्हे दाखल करा; विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मागणी, चार-चार मजली झोपडपट्टी उभी राहीपर्यंत यंत्रणा झोपा काढतात की हातमिळवणी करून अभय देतात? प्रवीण दरेकरांचा सवाल

8:57 pm (IST)

राज्यात दिवसभरात 11,449 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 12,207 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 393 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.45, मृत्युदर 1.77%
राज्यात सध्या 1 लाख 60,693 अॅक्टिव्ह रुग्ण

8:22 pm (IST)

मुंबई - दहिसर पूर्वमध्ये 3 घरं कोसळली
दुर्घटनेत 26 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

7:52 pm (IST)

ठाणे - तीन हाथ नाका परिसरात रिक्षातून पडून एका महिलेचा मृत्यू, महिलेच्या हातातून मोबाईल खेचण्याचा प्रयत्न, दोन बाईकस्वार चोरी करत असताना मोबाईल वाचवण्याच्या प्रयत्नात महिलेचा चालत्या रिक्षातून पडून मृत्यू, नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, 2 आरोपींना अटक

6:52 pm (IST)

नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचं ठरलं, त्यात वाद नको; दि.बा. पाटील आणि बाळासाहेब ठाकरे महान नेते, दि.बा. पाटील यांचं नाव इतर ठिकाणी देता येईल - एकनाथ शिंदे

6:25 pm (IST)

प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलल्यानं परमबीर सिंगांना पुन्हा दिलासा, 15 जूनपर्यंत अटक नाही, राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात दिली माहिती

6:07 pm (IST)

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा
3 लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदरानं कर्ज मिळणार
2% व्याजदर सवलत, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

6:06 pm (IST)

राज्यात 'हेरिटेज ट्री' उपक्रम राबवणार - आदित्य ठाकरे
महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरणाची स्थापना - आदित्य ठाकरे

5:14 pm (IST)

महावितरणकडून 5 कोटींची सीएम सहाय्यता निधीला मदत, ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊतांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

5:08 pm (IST)

पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष धोरण ठरणार
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचा पुढाकार
'राज्यभरात 2 लाख हक्काची घरं निर्माण करणार'
नगरविकास विभागाच्या माध्यमातून धोरण लवकरच

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स