LIVE :प्रताप सरनाईक यांची 78 एकर जमीन ईडीने केली जप्त, सोमय्यांचा दावा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 10, 2021, 16:41 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:56 (IST)

  औरंगाबाद - रेल्वे स्टेशन परिसरातील घटना
  16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
  पीडित मुलगी वाराणसीतील असल्याची शक्यता
  पीडितेची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी
  3 अज्ञातांविरोधात उस्मानपुरा पोलिसात गुन्हा

  21:56 (IST)

  मराठा आरक्षणावर उद्या दिल्लीत बैठक, अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार, दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात संध्याकाळी महत्वाची बैठक

  21:47 (IST)

  कोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात उद्या दुपारी 4 वाजता महत्वाची बैठक, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पंतप्रधान व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांशी बोलणार, केंद्र-राज्यात कशा पद्धतीनं समन्वय हवा यावर बैठकीत मोदी करणार चर्चा

  20:58 (IST)

  काश्मीरमधली हिमवृष्टी थांबल्यानं दिलासा
  काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे अडकलेले पर्यटक
  बर्फ वितळू लागल्यानं जनजीवन पूर्वपदावर
  वाहतुकीचा अडथळा दूर, पर्यटकांना दिलासा

  19:37 (IST)

  भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकरणात आज मुख्यमंत्री भंडाऱ्यात येऊनसुद्धा दोषींवर कारवाई झाली नसल्यामुळे भाजपकडून उद्या भंडारा जिल्हा बंदची हाक, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांची माहिती

  18:50 (IST)

  राज्यात दिवसभरात 3,558 नवीन रुग्ण
  राज्यात 2,302 रुग्णांची कोरोनावर मात
  राज्यात दिवसभरात 34 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.65%
  राज्यात सध्या 54,179 अॅक्टिव्ह रुग्ण 

  18:22 (IST)

  महिलांची सुरक्षा वाढवावी -चंद्रकांत पाटील
  'सुरक्षा काढल्यानं दौरे कमी होणार नाहीत'
  आम्ही काळजी करत नाही -चंद्रकांत पाटील
  जे चाललंय ते सूडबुद्धीनं -चंद्रकांत पाटील
  'कोरोना काळात आमची सुरक्षा परत केली होती'
  'फिरणाऱ्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न'
  'संवेदनशील, मनाला त्रास देणारी दुर्घटना'
  भंडारा दुर्घटनेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

  18:14 (IST)

  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन ठिकाणी वेगवेगळ्या अपघातात 2 रायडर्सचा मृत्यू, एकजण जखमी

  17:34 (IST)

  नागपुरात पिता-पुत्राकडून गुन्हेगाराची हत्या
  2 दिवसांपासूनच्या वादाचा शेवट हत्येनं
  पोलिसांनी दोघांनाही घेतलं ताब्यात

  17:17 (IST)

  नागपूर - कोंढळी भागात पक्ष्यांचा मृत्यू
  पोपट, चिमणी, कावळा, कबुतरांचा समावेश
  रिंगणाबोडी शिवारात मृत पोपटांचा सडा
  मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अस्पष्ट

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स