LIVE Updates: गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मुंबईतील बाजारपेठांत मोठी गर्दी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 09, 2021, 18:31 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:45 (IST)

  चंद्रपूर - 25 वर्षांच्या तरुणाचा 20 वर्षांच्या तरुणीवर चाकूहल्ला
  जखमी तरुणीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार
  तरुण-तरुणी एकमेकांना ओळखत असल्याची प्राथमिक माहिती
  चंद्रपूर पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात, तपास सुरू

  20:30 (IST)

  पिंपरी-चिंचवड : शाईफेक प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यानं नगरसेविकेसह 11 जणांवर गुन्हा दाखल

  19:41 (IST)

  कोरोनाच्या काळात करदात्यांना मोठा दिलासा, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ, आता आयकर रिटर्न 31 डिसेंबरपर्यंत भरता येईल

  19:31 (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामं फास्ट ट्रॅकवर पूर्ण करा - मुख्यमंत्री
  निजामकालीन शाळांचं रुपडं पालटणार, शहरांतील रस्ते सुधारणार
  पैठणचं संतपीठ लवकरच सुरू, औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गालाही चालना

  19:21 (IST)

  बुलडाणा - मलकापुरात मुलीनं केला बापाचा खून
  चुलत भावाच्या मदतीनं बापाला मारलं ठार
  घरगुती वादातून घडला धक्कादायक प्रकार
  मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  दोन्ही आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

  18:46 (IST)

  महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचं बाप्पाला साकडं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

  18:31 (IST)

  नीलम राणे, नितेश राणेंविरोधात लूकआऊट नोटीस
  30 जणांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी
  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काढलं सर्क्युलर
  25 कोटींच्या कर्जाची परतफेड केली नसल्याची तक्रार
  DHFL कंपनीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

  18:16 (IST)

  पुण्यात मनसेला शिवसेनेचा झटका, मनसे विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांचा शिवसेनेत प्रवेश, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

  18:0 (IST)

  'अनिल देशमुख लूकआऊट नोटीस प्रकरण न्यायप्रविष्ट'
  देशमुख प्रकरणावर मी बोलणं उचित नाही - गृहमंत्री

  17:58 (IST)

  'नीलम राणेंना कर्जप्रकरणी लूकआऊट सर्क्युलर'
  केंद्राच्या पत्रानंतर डीजींकडून पोलिसांना आदेश
  गृहमंत्री वळसे पाटलांची पुण्यात माहिती

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स