• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: नवनीत राणांचा फोटो व्हायरल, BMC ची लीलावती हॉस्पिटलला नोटीस

Live Updates: नवनीत राणांचा फोटो व्हायरल, BMC ची लीलावती हॉस्पिटलला नोटीस

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 09, 2022, 23:31 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:32 (IST)

  नागपूर रेल्वे स्टेशनवर सापडला जिवंत बॉम्ब
  रेल्वे स्थानकाच्या मुख्य दाराजवळ जिवंत बॉम्ब
  पोलीस बूथच्या बाजूला सापडला जिवंत बॉम्ब
  डॉग स्क्वॉड आणि BDDS टीम घटनास्थळी 

  20:30 (IST)

  दहावी, बारावीच्या पेपर तपासणीचं काम पूर्ण
  'बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत लागणार'
  'दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत लागणार'
  महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माहिती

  दहावी आणि बारावीच्या बोर्ड पेपर तपासणीचं काम जवळपास पूर्ण झालं असून बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत तर दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत लागणार; महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

  18:55 (IST)

  कोकणातील आमदारांची 'वर्षा'वरील बैठक संपली
  मुख्यमंत्र्यांची उपस्थितीत 'सह्याद्री'वर वेगळी बैठक
  एकनाथ शिंदे, अनिल परब, उदय सामंत उपस्थित 

  18:25 (IST)

  रवी राणा आणि नवनीत राणा दिल्लीत
  राणा दाम्पत्यानं घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट
  'आमच्यावरील अन्यायाबद्दल अध्यक्षांना सांगितलं'
  महाराष्ट्रात जे घडलं त्याची माहिती दिली - राणा
  'संजय पांडेंचीही लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार'
  आमच्यावर चुकीच्या पद्धतीनं कारवाई - राणा
  लोकसभा अध्यक्ष न्याय देतील ही अपेक्षा - राणा
  '23 तारखेला हक्कभंग समितीसमोर बाजू मांडणार' 

  17:58 (IST)

  डीसीपी सौरभ त्रिपाठी खंडणी प्रकरण 
  तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना जामीन मंजूर 
  हवाला ऑपरेटरकडून खंडणीचा होता आरोप 
  मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
  डीसीपी सौरभ त्रिपाठी मात्र अजूनही फरार 

  16:52 (IST)

  वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक
  कोकणातील शिवसेना आमदारांची बैठक
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक

  16:31 (IST)

  नवनीत राणा प्रकरणी हक्कभंग समितीची बैठक
  हक्कभंग समितीची 23 मे रोजी दिल्लीत बैठक
  सुनील सिंग यांच्या समितीसमोर होणार सुनावणी 

  16:31 (IST)

  अॅड.गुणरत्न सदावर्तेंची एसटी कर्मचाऱ्यांसाठी संघटना
  सदावर्तेंच्या संघटनेचं नाव 'एसटी कष्टकरी जनसंघ' 

  16:29 (IST)

  मला जातीवादी बोलल्यावर आस्वाद घेतला - पवार
  'लोक सीरियसली घेत नाहीत, ऐकून विसरून जातात'
  महागाईवर भोंगा हे काही उत्तर नाही - शरद पवार
  लोकांची मनं भरकटवण्याचा प्रयत्न होतोय - पवार
  सत्ता हातात नसल्यानं भाजप अस्वस्थ - शरद पवार
  'मविआविरोधात वक्तव्य, हा एक कलमी कार्यक्रम'
  भाजपचं अधिक लक्ष 'मविआ'कडे - शरद पवार 

  15:54 (IST)

  किरीट सोमय्यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
  महाराष्ट्रातील 19 घोटाळ्यांबद्दल चर्चा - सोमय्या
  पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाणार - सोमय्या
  'सरकारी वकील हे मुख्यमंत्री परिवाराचे आहेत का?'
  ...तर त्यांनी माझ्याविरोधात केस करावी - सोमय्या 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स