• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates : आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यातही ओमायक्रॉनची एन्ट्री, पहिला रुग्ण आढळला

Live Updates : आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यातही ओमायक्रॉनची एन्ट्री, पहिला रुग्ण आढळला

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 10, 2022, 00:01 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:40 (IST)

  कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे चिंता वाढली
  राज्यात दिवसभरात 44 हजार 388 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात कोरोनाच्या 12 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 15,351 रुग्ण कोरोनामुक्त

  19:28 (IST)

  मुंबईत दिवसभरात 19 हजार 474 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 7 रुग्णांचा मृत्यू

  19:0 (IST)

  उस्मानाबाद जिल्ह्यात 5 नवे ओमायक्रॉनचे रुग्ण
  कळंब तालुक्यात 3, उमरगा 1, उस्मानाबादेत 1 रुग्ण

  18:41 (IST)

  साखर कारखानदारांना केंद्राचा मोठा दिलासा
  साखर विकास फंडातील कर्जाचं होणार पुनर्गठन
  देशभरातील साखर कारखान्यांना कर्जातून मिळणार दिलासा

  17:58 (IST)

  मोदींकडून देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा
  कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यावर चर्चा
  उपाययोजना करण्याच्या नरेंद्र मोदींकडून सूचना

  17:45 (IST)

  पुण्यात दिवसभरात 4029 नवीन रुग्णांची भर
  पुण्यात दिवसभरात 688 रुग्णांना डिस्चार्ज
  पुणे शहरात कोरोनाबाधित एका रुग्णाचा मृत्यू

  17:25 (IST)

  कोकणच्या लाल मातीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा
  वैभववाडीच्या नाधवडे गावात बैलगाडा शर्यत संपन्न
  विविध भागातील बैलगाडा मालक होते सहभागी
  कोरोनाचे नियम पाळून बैलगाडा शर्यत पडली पार

  16:52 (IST)

  बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश
  दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई
  बिहारच्या चंपारणातून रेसूल आझमला अटक
  नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पसरलं रॅकेट

  16:16 (IST)

  मी पहिल्यांदा जे बोललो त्यावर आजही ठाम - आव्हाड
  मी माझं वक्तव्य बदलणारा माणूस नाही - आव्हाड
  मी जे बोलतो ते माझ्या हृदयापासून असतं - आव्हाड
  'पोटात एक, ओठात एक असं बोलणारा माणूस नाही'

  15:14 (IST)

  सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेवर निर्बंध, यात्रेसाठी प्रशासनाकडून केवळ 50 लोकांनाच परवानगी, यात्रेतील तैलाभिषेकासाठी सात नंदीध्वजासोबत एका व्यक्तीला वाहनातून परवानगी, संमती कट्ट्यावरील विवाह सोहळ्याला केवळ 50 लोकांनाच परवानगी, शोभेचं दारूकाम तसेच सुगडी पूजनाला परवानगी नाही, 12 ते 16 जानेवारीदरम्यान सिद्धरामेश्वरांची यात्रा, नंदीध्वज मिरवणुकीसही परवानगी नाकारली असून मंदिरातच नंदीध्वजाचं पूजन करण्याचे आदेश, सोलापूर मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांचा निर्णय

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स