नागपुरात काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नागपुरात काँग्रेसच्या गोटात घडामोडींना वेग. ऐनवेळी उमेदवार बदलला. "मी असमर्थता दर्शवली नाही. पत्रात मात्र काँग्रेसने असमर्थता दर्शवली असे म्हटले आहे. पण जर काँग्रेसला वाटत असेल की ही निवडणूक छोटू भोयर ह्यांच्या नावावर जिंकू शकत नाही आणि म्हणून त्यांनी उमेदवार बदलला असेल तर मी त्या निर्णयाचा स्वीकार करतो, देशमुखला जिंकण्यासाठी मी जे जे करू शकतो ते ह्या 12 तासात करीन", अशी प्रतिक्रिया रवींद्र भोयर यांनी दिली.