liveLIVE NOW

LIVE : साताऱ्यात 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला, पालकमंत्र्यांची घोषणा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 09, 2021, 11:30 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 7 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:11 (IST)

  पिंपरी-चिंचवड : जम्बो कोविड सेंटरचा ठेका अखेर खंडित, डॉक्टरांची सेवा पालिकेकडून अधिग्रहित, पिंपरीतील 'त्या' कोविड सेंटरचा ताबा पालिकेकडे, कोविड सेंटर चालवणाऱ्या ठेकेदारानं रुग्ण नसताना घेतलं होतं 3 कोटींचं बिल, 'न्यूज18 लोकमत'नं लावून धरली होती बातमी

  21:4 (IST)

  मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी भाजप शिष्टमंडळाला भेट नाकारली, मुंबईकरांना मोफत लसीकरण केलं जावं या मागणीसाठी शिष्टमंडळ भेटणार होतं, मात्र मुंबई मनपा आयुक्तांनी राज्य सरकारचा अशी बैठक घेण्याला विरोध आहे असं सांगत भेट नाकारली

  20:44 (IST)

  मुंबईसाठी दिलासादायक बातमी
  मुंबईत दिवसभरात 3375 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 2403 नवीन रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 68 रुग्णांचा मृत्यू

  20:15 (IST)

  पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 2025 नवे रुग्ण
  पुण्यात दिवसभरात 4825 कोरोनामुक्त
  पुण्यात दिवसभरात 54 कोरोना रुग्णांचा मृत्यू

  19:56 (IST)

  राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज पुन्हा घट
  राज्यात दिवसभरात 60 हजार 226 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 48,401 नव्या रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 572 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 86.04, मृत्युदर 1.49%
  राज्यात सध्या 6 लाख 15,783 ॲक्टिव्ह रुग्ण

  18:42 (IST)

  धारावी आणि दादर परिसरात रुग्णसंख्येत घट
  धारावीत दिवसभरात 13 नव्या रुग्णांची नोंद
  दादरमध्ये 16 तर माहीममध्ये 34 नवे रुग्ण

  18:29 (IST)

  दुसरं कमिशन बसवून काय साध्य होणार नाही - पटोले
  'एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचे केंद्राला अधिकार'
  नाना पटोलेंचा राज्य सरकारला घरचा आहेर
  राज्य सरकारला कोणताही धोका नाही - नाना पटोले
  भाजपच्या नवनव्या तारखांवरून पटोलेंचा टोला

  18:18 (IST)

  एनआयव्हीनं रिसर्चसाठी नेली होती माकडं
  सर्व माकडं सुरक्षित, यशस्वी लसीकरणाचे प्रयोग
  TTCची प्रयोगासाठी माकडं पकडून देण्यास मदत
  मुख्य वनजीव रक्षकांची घेतली होती परवानगी
  काही माकडं परत मूळ अधिवासात सोडली
  एनआयव्हीसोबतच टीटीसीचाही खारीचा वाटा

  18:2 (IST)

  राज्यात निवडणूक राजकीय पक्षाचा भाग - पटोले
  प्रत्येकजण तयारी करत असतात - नाना पटोले
  'विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी करा'
  'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींच्या सूचना'
  केंद्र सरकारनं मात्र पालन केलं नाही - नाना पटोले
  देशात वाईट स्थिती झाली - नाना पटोले
  नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

  17:41 (IST)

  मुंबई - 7 किलो युरेनियम जप्त प्रकरण
  युरेनियम प्रकरणाचा NIAकडे दिला तपास
  एटीएसनं 2 जणांना घेतलं होतं ताब्यात

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स