• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Updates: भिवंडी परिसरात जोरदार पाऊस, शहरातील सखल भागात साचलं पाणी

LIVE Updates: भिवंडी परिसरात जोरदार पाऊस, शहरातील सखल भागात साचलं पाणी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 08, 2021, 15:09 IST
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:5 (IST)

  ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा
  बुलेट ट्रेन जागा हस्तांतरण प्रस्तावाला अखेर मंजुरी
  जागा देण्यास शिवसेना आणि भाजपमध्ये सहमती

  21:53 (IST)

  राज्यात दिवसभरात 4 हजार 174 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत दिवसभरात 532 नवे रुग्ण, 4 मृत्यू

  21:34 (IST)

  टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर
  भारतीय संघात 15 खेळाडूंचा समावेश
  विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल. राहुल संघात
  सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन संघात
  हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, राहुल चहर संघात
  आर.अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती संघात
  जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

  20:32 (IST)

  मोतीलाल नगर पुनर्विकासाबाबत कॅबिनेट बैठकीत खडाजंगी
  खासगी विकासकाला प्रकल्प द्यायला देसाईंचा विरोध
  म्हाडा असताना खासगी विकासक का? - सुभाष देसाई
  जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा
  आधीच गोरेगावात पत्राचाळीचा विकास रखडलाय
  यामध्ये आता या प्रकल्पाची भर नको
  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दबावापुढे प्रकल्प मंजूर?

  20:10 (IST)
  जळगाव जिल्ह्यात केळी पिकाच्या नुकसानीची उर्वरित भरपाई द्या तसंच या पावसात चाळीसगाव-जामनेर या ठिकाणी झालेल्या नुकसानीची मदत तातडीनं द्यावी, अशी मंत्रिमंडळ बैठकीत मागणी केली - पालकमंत्री गुलाबराव पाटील
   
  19:23 (IST)

  केंद्रीय मंत्री राणेंनी उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र
  चिपी विमानतळावरून वाद सुरू असताना पत्र
  राणेंचं आरोग्यसेविकांबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र
  'आरोग्यसेविकांना कामावरून कमी करणं योग्य नाही'

  18:32 (IST)

  मुंबई - राणीच्या बागेतील पेंग्विनसाठीचं टेंडर मागे
  पेंग्विनसाठीचं 15 कोटींचं टेंडर पालिकेनं घेतलं मागे
  पेंग्विनची जास्तीत जास्त देखभाल मनपाच करणार
  पालिकेचे डॉक्टर नेमले जावेत - मनपा आयुक्त
  नवीन टेंडर फेरबदल करून सादर करण्याचे आदेश
  काँग्रेस, भाजपनं शिवसेनेवर साधला होता निशाणा

  17:59 (IST)

  'बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पांच्या कामाला गती द्या'
  उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  17:57 (IST)

  गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नवी नियमावली
  सार्वजनिक गणपतींचं ऑनलाईन दर्शन घेता येणार
  प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर प्रतिबंध
  सार्वजनिक मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी
  सार्वजनिक गणपतींचं मुखदर्शनही घेता येणार नाही

  17:42 (IST)

  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय - महानिर्मितीच्या जागांवर प्रस्तावित 187 मे.वॅ. आणि 390 मे.वॅ. क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास मंजुरी, प्रकल्पासाठी भागभांडवलही उपलब्ध करून देणार, मुंबईच्या गोरेगाव येथील मोतीलाल नगर वसाहत 1, 2 आणि 3 या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासास मान्यता

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स