LIVE Updates: दिल्लीवरून महाराष्ट्र सरकारला रोज त्रास दिला जातो, शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 08, 2021, 15:38 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:57 (IST)

  उसाची FRP एकरकमीच मिळणार - पियूष गोयल
  माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांना आश्वासन

  20:55 (IST)

  उसाची FRP एकरकमीच मिळणार - पियूष गोयल
  माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांना आश्वासन

  20:0 (IST)

  'निवासी डॉक्टरांना प्रत्येकी 1 लाख 21 हजार रुपये'
  मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तातडीनं शासन निर्णय जारी
  सर्व शासकीय, पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टर
  कोरोनाकाळात निवासी डॉक्टरांनी बजावली रुग्णसेवा

  19:40 (IST)

  पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते पहिल्या टप्प्यात कोथरूड आणि शिवाजीनगर मतदारसंघातील मनसे शाखाध्यक्षांना नियुक्तीपत्र वाटप

  18:59 (IST)

  नंदुरबार - आयान मल्टिट्रेड साखर कारखान्यावर छापेमारी
  आयकर विभागाचं छापासत्र आज दुसऱ्या दिवशीही सुरूच
  कागदपत्रांसह संगणक आणि इतर गोष्टींची झाडाझडती
  कारवाईबाबत या दोघांनी अद्यापही संवाद साधलेला नाही

  18:7 (IST)

  MPSC परीक्षार्थींना सरकारकडून मोठा दिलासा
  MPSC 2021 च्या जाहिरातीत आणखी 100 जागा
  आता 290 ऐवजी 390 जागांसाठी होणार परीक्षा

  17:19 (IST)

  नाशिक - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी 19, 20 आणि 21 नोव्हेंबर या 3 तारखा प्रस्तावित, येत्या 2 दिवसांत निर्णय घेतला जाण्याचे संकेत

  17:11 (IST)

  ड्रग्ज प्रकरणातील सर्वात मोठी बातमी
  आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला
  अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचाही अर्ज फेटाळला
  मुंबईतील किला कोर्टाकडून दिलासा नाही
  आता सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार

  16:42 (IST)

  आयकरला धाडी टाकण्याचा अधिकार - अजित पवार
  'आता बोलून कारवाईत व्यत्यय आणायचा नाही'
  पाहुणे लोकांना डिस्टर्ब करायचं नाही - अजित पवार
  माझा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी - अजित पवार
  हे धान्यात घ्या, त्यामुळे चिंता नाही - अजित पवार
  शिळ्या कढीला ऊत आणायचा नाही - अजित पवार
  चौकशी होऊ द्या, मग सविस्तर बोलेन - अजित पवार
  11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचा निर्णय - अजित पवार
  महाराष्ट्र बंदचा निर्णय पक्षीय स्तरावर - अजित पवार

  16:39 (IST)

  सिंधुदुर्ग - चिपी विमानतळ उद‌्घाटनासाठी सज्ज
  उद्या होणार चिपी विमानतळाचं उद‌्घाटन - राणे
  'आधीपासूनच सिंधुदुर्गच्या विकासासाठी कार्यरत'
  चिपी विमानतळाचं श्रेय फक्त भाजपचं - राणे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स